Physical Fitness: अनेकवेळा खेळाडूंना किंवा आपल्या सारख्या नॉर्मल लोकांनाही धावत असताना अचानक क्रॅम्प्स येतात. याच्या वेदना फार असतात. कधी-कधी परिस्थिती अशी होते की काही वेळेसाठी हालचाल करणेही कठीण होते. क्रिकेट विश्वचषक हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. वर्ल्डकपमध्ये तुम्ही मॅक्सवेल आणि शुभमन गिल यांच्यासह अनेक खेळाडूंना मैदानावर अचानक वेदना सहन करताना पाहिले असेल. वास्तविक, अचानक होणारी ही वेदना म्हणजे क्रॅम्प आहे. क्रॅम्प्समुळे, अनेकदा खूप जास्त वेदना होतात. आरोग्य तज्ञांच्या मते, हे क्रॅम्प्स काही मिनिटे राहू शकतात किंवा काही तासांपर्यंत तुम्हाला त्रास देऊ शकतात. या वेदना कधी कधी फारच असह्य होतात.
कोणताही मैदानी खेळ खेळताना अनेकदा क्रॅम्पच्या घटना घडतात. खराब हवामान आणि शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प्स होऊ लागतात. मैदानी खेळादरम्यान शरीराला खूप घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता सुरू होते. अशावेळी पाणी न पिल्यास शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स येतात.
डिहायड्रेशनमुळेच नव्हे तर पोटॅशियमच्या कमतरतेमुळे देखील क्रॅम्प्स येऊ शकतात. पोटॅशियम प्रामुख्याने स्नायू पेशी आणि मज्जासंस्था नियंत्रित करते. पोटॅशियम स्नायूंच्या आकुंचन-विस्ताराच्या प्रक्रियेत आणि मज्जातंतूंमधून मेंदूपर्यंत सिग्नल प्रसारित करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना क्रॅम्प्स येऊ लागतात.
तुमच्या पायात जास्त क्रॅम्प येत असल्यास, स्ट्रेचिंग करा. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. स्वतःला शक्य तितके हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या