Suicide: का करतात माणसं आत्महत्या? कशी असते त्यावेळची मानसिक अवस्था?
Thought Behind Suicide: नुकतंच प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याखेरीज गेल्या काही काळात अनेक आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. पण एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे काय मानसिकता असू शकते ती जाणून घेऊयात...
Mental Health Care: नुकतंच आज (२ ऑगस्ट २०२३) ला प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Suicide) त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याखेरीज गेल्या काही काळात अनेक मोठं मोठ्या व्यक्तीमत्त्वांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत १५ ते २४ वयोगटातील तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे. या सगळ्यातून एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे लोक आत्महत्या का करतात? (reason behind committing suicide) असं काय होतं जे त्यांना एवढं मोठं टोकाचं पाऊल टाकायला भाग पाडतं.
ट्रेंडिंग न्यूज
आजकाल आत्महत्येचे विचार अगदी सामान्य झाला आहे. आधुनिक जीवनाच्या या दबावामुळे, काहीजण वैयक्तिक आयुष्यात पूर्णपणे निराश झाले आहेत. त्यांना असे वाटते की त्यांच्यात चांगल्या गोष्टी बदलण्याची शक्ती नाही. ते स्वत: ला पूर्ण अंधारात आणि निराशेमध्ये बुडलेले बघतात.
आत्महत्येचे विचार कशामुळे येतो?
मानसिक आजार
एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येच्या निर्णयामागील सर्वात सामान्य मानसिक आरोग्य स्थिती म्हणजे खूप नैराश्य. नैराश्यामुळे लोकांच्या भावनिक वेदना आणि आशा नष्ट होऊ शकते, ज्यामुळे त्यांना स्वतःचे जीवन संपवण्याशिवाय आराम मिळवण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही.
अत्यंत क्लेशकारक ताण
ज्या लोकांना बालपणातील लैंगिक शोषण, बलात्कार, शारीरिक शोषण किंवा युद्धाचा आघात यांसारखा अत्यंत क्लेशकारक अनुभव आला आहे त्यांना या घटना घडून बरेच वर्ष झाल्यानंतर आत्महत्येचा विचार डोक्यात येऊ शकतो. हा धोका विशेषतः अशा पुरुषांसाठी जास्त असतो ज्यांनी जीवनात अत्यंत भावनिक धक्का देणारे प्रसंग अनुभवले आहेत.
World Suicide Prevention Day : चिंता, डिप्रेशन विसरा, फक्त फॉलो करा या गोष्टी!
हताशपणा
हताशपणा, मग तो थोड्या वेळासाठीचा असो वा जास्त काळासाठीचा .. हा हताशपणा आत्महत्येच्या विचारांना हातभार लावतो असं अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. व्यक्तीचा हताशपणा जितका जास्त असेल तितकचं त्यांच्या आत्महत्येचा प्रत्यत्न करणायची मानसिकता वाढेल.
इतरांवर ओझे आहे असं वाटणे
तीव्र वेदना किंवा मोठे आजार असलेल्या व्यक्तीला इतरांसाठी ओझे वाटू शकते. त्यांना काळजी वाटू शकते की ते आपल्यामुळे आपल्या व्यक्तींना त्रास आपण त्यांना मदत मागून किंवा हॉस्पिटलची बिले भरण्यासाठी मदत मागून त्रास निर्माण करत आहेत.
सामाजिकदृष्ट्या एकट पडणे
मित्र किंवा जोडीदार गमावणे, विभक्त होणे किंवा घटस्फोट घेणे, शारीरिक किंवा मानसिक आजार, सामाजिक चिंता, सेवानिवृत्ती किंवा नवीन ठिकाणी जाणे यासह अनेक कारणांमुळे एखादी व्यक्ती सामाजिकदृष्ट्या एकटी होऊ शकते. यामुळेही आत्महत्येचे विचार येऊ शकतो.
Suicide Prevention: थांबा, आत्महत्येचा विचार करत असाल तर या गोष्टी आधी करा!
हवी तशी मदत न मिळणे
काहीवेळा लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात कारण त्यांना खरोखर मरायचे नसते, परंतु त्यांना या विचारून बाहेर पडण्यासाठी मदत कशी घ्या हे माहित नसते. स्वत:ला मारण्याच्या उद्देशाशिवाय आत्महत्येच्या कृतीची नक्कल करणे याला पॅरासुसाइड असे संबोधले जाते. काही प्रकरणांमध्ये, आत्महत्येचे प्रयत्न हे जगाला दाखवून देण्याचा एक मार्ग बनतात की त्यांना किती त्रास होत होता.
कोणत्याही वाईट गोष्टीवर आत्महत्या हा उपाय नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला कधीही असे विचार आले तर आवर्जून मदत मागा. यासाठी अनेक संस्था काम करत आहेत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग