Why Do Dogs Run Behind Vehicles: अनेक वेळा आपण बाईक किंवा कारने जात असताना अचानक गाडीच्या मागे कुत्रे धावत येतात. वेगाने धावत येणाऱ्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी अनेक वेळा गाडीचा वेग वाढवला जातो. अशाच पडण्याची किंवा अपघात होण्याची भीती असते. गाड्यांच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांचा सर्वात जास्त त्रास दुचाकी स्वारांना असतो. अनेक वेळा तुमच्यासोबत देखील असे घडले असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का घडते? कुत्रे गाड्यांच्या मागे का धावतात हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर या काही गोष्टी येथे जाणून घ्या.
रस्त्यावरून जाणाऱ्या कार किंवा बाइकचा पाठलाग कुत्रे का करतात हा प्रश्न अनेक वेळा मनात येतो. हे कुत्रे आपला पाठलाग करतात तेव्हा आपण गाडीचा वेग वाढवतो. जेणेकरून लवकरात लवकर त्या कुत्र्यांपासून सुटका होईल. या काळात तुम्हाला कुत्र्यांचा खूप राग येत असेल, पण कुत्रे असे का वागतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तविक विज्ञानानुसार, कुत्र्यांच्या या वागण्याला तुम्ही जबाबदार नसून, तुमच्या वाहनाचे टायर त्यांचे लक्ष्य असतात. किंबहुना, तुमच्या वाहनाच्या टायरमधून येणाऱ्या इतर कुत्र्यांच्या वासामुळे कुत्रे आक्रमक होतात. कुत्र्यांना वासाची तीव्र भावना असते हे सर्वांनाच माहीत आहे. कुत्रे इतर कुत्र्यांचा वास फार लवकर पकडतात.
तुम्ही अनेकदा कुत्र्यांना वाहनांच्या टायरवर लघवी करताना पाहिलं असेल. कुत्रे त्यांचा सुगंध इतर कुत्र्यांना पाठवण्यासाठी वाहनांच्या टायर किंवा खांबांना लक्ष्य करतात. मग जेव्हा तुमची कार एखाद्या एरियामधून किंवा रस्त्यावरून जाते, तेव्हा त्या ठिकाणच्या कुत्र्यांना तुमच्या टायरवर दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो. या वासामुळे कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे धावू लागतात. वास्तविक, कुत्र्यांना त्यांच्या एरियामध्ये इतर भागातील कुत्रे सहन होत नाहीत. यामुळेच जेव्हा कुत्रे वाहनाच्या मागे धावतात तेव्हा त्यांना तुमच्या गाडीच्या टायरमधून दुसऱ्या भागातील कुत्र्याचा वास येतो.
जर भूतकाळात किंवा कधी त्या वाहनाने त्यांचा एखादा साथीदार कधी जखमी झाला असेल किंवा त्या वाहनाच्या अपघातामुळे त्यांचा एखादा साथीदार मरण पावला असेल, तरीदेखील ते त्या वाहनाच्या मागे धावतात. तसेच कधी त्यांना गाडीच्या स्पीडमुळे त्यांच्यावर किंवा त्यांच्या मालकावर हल्ला होण्याची भीती असल्याने देखील ते जोरजोरात भूंकू लागतात आणि गाडीच्या मागे धावतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या