Do You Know: हे तुम्हाला माहीतच असेल की चौकाचौकांजवळ आणि अंडरपासजवळ रस्त्यावर पांढरे-काळेपट्टे असतात, ज्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. हे क्रॉसिंग लोकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले जातात. वाहन चालवणाऱ्या लोकांना त्यांचे वाहन कुठे थांबवायचे आणि रस्ता ओलांडणाऱ्यांना रस्ता ओलंडण्यासाठी सोप्प जावं यासाठी हे झेब्रा क्रॉसिंग असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याला झेब्रा क्रॉसिंग असे नाव का पडले.
झेब्रा क्रॉसिंग हे नाव कसे पडले ते प्रथम जाणून घेऊयात. काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या क्रॉसिंगमुळे ते झेब्रा प्रिंटसारखे दिसते, त्यामुळे याला झेब्रा क्रॉसिंग म्हटले जाऊ लागले.
डांबरी बनवलेले रस्ते काळे असतात म्हणूनच त्यावर जेव्हा पांढरे पट्टे काढले जातात तेव्हा ते कॉन्ट्रास्ट उठून दिसतात. हा रंग ठरण्यापूर्वी क्रॉसिंगसाठी अनेक रंग निवडले गेले होते. परंतु पांढरा रंग सर्वात योग्य ठरले, कारण त्यावर चालणारे लोक सहज दिसतात. तथापि, अनेक देशांनी त्यानुसार क्रॉसिंगचे डिझाइन किंवा रंग बदलले आहेत.
झेब्रा क्रॉसिंगबद्दल नियमावलीही करण्यात आली आहे. लाल सिग्नल असताना वाहनचालकांना आपली गाडी रस्त्यावरील पट्टीच्या मागे उभी करावी लागते. त्या पट्ट्यासमोर झेब्रा क्रॉसिंग बनवण्यात आले आहे, जेणेकरून पायी जाणारे लोक ते ओलांडू शकतील. परंतु वाहनचालक पिवळी पट्टी ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण लक्षात घ्या असे केले तर तुम्हाला यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो. पिवळ्या पट्टीच्या पलीकडे वाहन पार्किंग केल्यास लाल सिग्नल तोडल्यासही दंड भरावा लागू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)