Naphthalene Balls for Clothes: हळू हळू हिवाळ्याच्या महिना संपत आला आहे. सूर्यप्रकाश वाढत आहे. उन्हाळा येत असल्याने लोकरीच्या कपड्यांची गरज आता वाटत नाहीये.अनेकजण लोकरीचे कपडे धुवून, ड्राय क्लीन करून त्यांला योग्यरीत्या पॅक करून ठेवत आहेत. अनेकदा लोकरीचे कपडे पॅक करताना नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरल्या जातात. पण तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल की या गोळ्या का ठेवल्या जातात. या गोळ्या कपड्यांमध्ये ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
नॅफ्थलीन गोळ्या कपड्यात किंवा कपाटात फार आधी पासून ठेवल्या जातात. नॅफ्थलीनमध्ये काही रसायने असतात ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. खरं तर या गोळ्या हवेच्या संपर्कात आल्यावर हळू हळू मेल्ट होऊ लागतात. कपड्यांमधील ओलाव्यामुळे होणारा वास या गोळ्या टाळण्यास मदत करतात. याशिवाय कपड्यांना कपाटात ठेवल्यानंतर लागणारे पांढरे बुरशी किंवा गंज अशा सर्व प्रकारच्या नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी या गोळ्या ठेवल्या जातात.
रेशीम आणि सुती कपड्यांसारखे नैसर्गिक फायबरचे कपडे खराब होण्यास या गोळ्या उपयुक्त ठरतात. नॅप्थलीन तीव्र गंध उत्सर्जित करून किड्यांना दूर ठेवतो आणि त्यांना कपडे आणि कापडांवर अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करतात.
लोकरीचे कपडे, स्नानगृहे, शौचालये, बाथरूम अशा ठिकांतील दुर्गंधी दूर करण्यासाठी नॅप्थालीन गोळ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.
बहुतेक लोक त्यांच्या कपड्यांमध्ये नॅप्थलीन योग्य पद्धतीने ठेवत नाहीत. ही पद्धत चुकीची आहे. लहान कपड्यांमध्ये नॅफ्थलीनच्या गोळ्या बांधून त्याची पोटली तयार करा. या पोटल्या तुम्ही कपड्यांमध्ये ठेवाव्यात. याचप्रमाणे, नॅफ्थलीनच्या गोळ्यांच्या पोटल्या वॉर्डरोब किंवा कपाटामध्ये देखील ठेवाव्यात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या