WHO prohibits consumption of these foods: अलीकडच्या काळात असे अनेक खाद्यपदार्थ बनवले जाऊ लागले आहेत, जे जिभेला उत्तम चव तर देतात. पण शरीरात जाताच दुष्परिणाम करायला सुरुवात करतात. विशेष म्हणजे ते लगेच ओळखता येत नाही, पण अगदी हळूहळू तुमचे शरीर दूषित होऊ लागते. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अशा अनेक खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे. ज्यात लोकांनी काही पदार्थ अजिबात खाऊ नयेत किंवा खाल्ले तर फार कमी प्रमाणात खाण्याची सूचना देण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या या यादीमध्ये अनेक पदार्थांचा समावेश आहे जे बरेच लोक दररोज खातात. हे पदार्थ नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया.
डब्ल्यएचओच्या रिपोर्ट्सनुसार, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स जगातील सर्वात हानिकारक वस्तू आहेत. पास्ता आणि ब्रेड केवळ रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सपासून बनवले जातात. गोड स्नॅक्समध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्सदेखील असतात. या गोष्टी रक्तातील साखर वाढवतात. पास्ता आणि ब्रेड या अति-प्रक्रिया केलेल्या गोष्टी आहेत. ज्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे पदार्थ खाण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
पिझ्झा आणि बर्गर हे अति-प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत. ज्यामध्ये भरपूर लोणी, चीज, मीठ आणि अनेक अनहेल्दी प्रकारची रसायने घातली जातात. या सर्व गोष्टींमुळे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे पिझ्झा बर्गरचा वापर कमीत कमी केला पाहिजे. शक्यतो या गोष्टी दररोज खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे.
अलीकडच्या काळात बटाटा चिप्स हे आपल्या आहाराचाच एक भाग बनला आहे. आपल्यापैकी बरेच जण दररोज बटाट्याचे चिप्स खातात. बटाट्याचे चिप्स रिफाइंड तेलात खूप जास्त तापमानात गरम केले जातात. त्यात भरपूर मीठ वापरले जाते. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. त्यात कॅलरीजही भरपूर असतात. त्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा हे चिप्स देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.
साखरेशिवाय भारतातील लोकांची कल्पनाच करता येत नाही. प्र्त्ये पदार्थात लोकांना साखर आवश्यक वाटते. पण जास्त साखर आपल्यासाठी खूप घातक आहे. जास्त साखरेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे तणाव वाढतो. जास्त साखर यकृत, स्वादुपिंड आणि आतड्यांसंबंधी समस्या वाढवतात. त्यामुळे साखरेचे जास्त सेवन करू नये. जर साखरेची पातळी वाढली असेल तर साखरेचे सेवन अजिबातच करू नये.
WHO च्या मते, कोणत्याही परिस्थितीत दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे गंभीर आजार होतात. त्यामुळे ज्या गोष्टींमध्ये मीठ जास्त आहे ते फार कमी खावे किंवा अजिबात खाऊ नये.
अलीकडच्या काळात चीजचा वापर अनेक गोष्टींमध्ये होतो. चीजदेखील एक अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे. ज्यामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असते. हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळेही लठ्ठपणा येतो.
बदलत्या जीवनशैलीनुसार आजकाल अनेक घरांमध्ये पाम तेल वापरले जाते. पाम तेल आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे हृदयाला मोठी हानी होते. पाम तेल कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे पाम तेलाचे सेवन करू नये. असा आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे