Side Effects of Toor or Arhar Dal: भात, भाजी आणि पोळी सोबत वरण किंवा डाळ दिल्याशिवाय भारतीय जेवणाची थाळी पूर्ण मानली जात नाही. डाळींमध्ये सुद्धा तूर डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. प्रथिने, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी अनेक पोषक तत्वे तूर डाळमध्ये आढळतात. जे तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या चवीचीही काळजी घेतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही, काही लोकांनी तूर डाळ खाणे टाळले पाहिजे. याचे सेवन केल्यास त्यांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल ज्यांना गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या आहेत, तर तूर डाळ तुमची समस्या आणखी वाढवू शकते. तूर डाळ पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे पोटदुखी, आंबट ढेकर येणे आणि गॅस तयार होणे असे त्रास होऊ शकतात.
ज्यांना आधीच किडनीचा आजार आहे त्यांनी तूर डाळ खाणे टाळावे. तूर डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या समस्या आणखी वाढू शकतात. एवढेच नाही तर या डाळीचे अतिसेवन केल्याने पोटात स्टोनची समस्या देखील होऊ शकते.
जर तुम्हाला मुळव्याधची समस्या असेल तर तुम्ही तूर डाळ खाणे टाळावे. तूर डाळमधील प्रथिने पचणे पचनसंस्थेला खूप कठीण जाते. त्यामुळे पोटात बद्धकोष्ठता निर्माण होऊ लागते आणि व्यक्तीला सकाळी पोट साफ करण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो. त्यामुळे मूळव्याधच्या रुग्णांची समस्या वाढते आणि त्यांच्या सूज आणि रक्तस्त्राव यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.
ज्या लोकांना आधीच युरिक अॅसिडचा त्रास आहे त्यांनी तूर डाळीचे सेवन करू नये. तूर डाळमधील प्रथिनांच्या मुबलक प्रमाणामुळे शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे व्यक्तीला हातपाय दुखणे आणि सांध्यांना सूज येऊ शकते.
जर तुम्हाला तूर डाळीची एलर्जी असेल तर चुकूनही ही डाळ खाऊ नका, विशेषतः रात्री. असे केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तूर डाळीमधील प्रथिने, लोह आणि पोटॅशियम हे पोषक तत्व सहजासहजी पचत नाहीत. हेच कारण आहे की ज्या लोकांना तूर डाळीची एलर्जी आहे त्यांना ते खाणे टाळावे.
तूरीच्या डाळीचे वरण बनवताना डाळ पाण्याने चांगली धुवावी. डाळ धुतल्याशिवाय अजिबात शिजवू नका. वरण बनवण्यापूर्वी डाळ २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. डाळ भिजवल्याने फुगते आणि चांगली होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या