Jackfruit Side Effects: या लोकांनी चुकूनही खाऊ नये फणस, फायद्याऐवजी आरोग्याचे होते नुकसान
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Jackfruit Side Effects: या लोकांनी चुकूनही खाऊ नये फणस, फायद्याऐवजी आरोग्याचे होते नुकसान

Jackfruit Side Effects: या लोकांनी चुकूनही खाऊ नये फणस, फायद्याऐवजी आरोग्याचे होते नुकसान

Published Jul 16, 2024 01:03 PM IST

Who Should Not Eat Jackfruit: काही लोकांनी जॅकफ्रूटचे सेवन करणे टाळले पाहिजे, हे तुम्हाला माहित आहे का? त्यांना फणसाच्या सेवनाने फायदा होत नाही तर आरोग्याला हानी पोहोचते.

फणस खाण्याचे दुष्परिणाम
फणस खाण्याचे दुष्परिणाम (unsplash)

Side Effects of Jackfruit: जॅकफ्रूट म्हणजेच फणस जर चांगलं शिजवलं तर ते नॉनव्हेज सारखं दिसतं. फणसमध्ये असलेले प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅगनीज, राइबोफ्लेविन यासारखे पोषक घटक व्यक्तीची पचनसंस्था, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करताना आरोग्यास अनेक फायदे देतात. फणसामध्ये हाय कॅलरी असूनही, ते कोलेस्ट्रॉल किंवा सॅच्युरेटेड फॅटपासून मुक्ती देऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का, आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी फणसाचे सेवन टाळावे? फणसाच्या सेवनाने फायदा होत नाही तर आरोग्याला हानी पोहोचते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी फणस खाऊ नये.

एलर्जी

ज्या लोकांना लेटेक्स किंवा बिर्च पोलनची एलर्जी आहे त्यांनी विशेषत: फणसाचे सेवन करणे टाळावे. फणस खाल्ल्याने त्यांना एलर्जीची लक्षणे दिसू शकतात. एलर्जी श्वसन प्रणालीवर परिणाम करते आणि काही लोकांना रेस्पिरेटरी सिस्टीमची समस्या किंवा काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा फणसाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. फणसामध्ये असलेले अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. मधुमेहींनी दररोज जास्त प्रमाणात फणसाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय रित्या खाली जाऊ शकते. जे शुगर रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.

प्रेग्नेंसी

गरोदर महिलांनी गरोदरपणात फणसाचे सेवन करणे टाळावे. फणसामध्ये असलेले अघुलनशील फायबर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास हानी पोहोचवू शकते. फणस खाल्ल्याने गर्भपात होण्याची शक्यताही वाढते. याशिवाय स्तनपान देणाऱ्या महिलांनीही फणस खाऊ नये. या महिलांनी फणसाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

किडनीचे आजार

जर तुम्ही किडनीच्या आजाराशी झगडत असाल तर फणसाचे सेवन टाळा. फणसामध्ये असलेले पोटॅशियम रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढवून मूत्रपिंडासाठी समस्या निर्माण करू शकते. या अवस्थेला हायपरक्लेमिया म्हणतात. ज्यामुळे अर्धांगवायू आणि हॉर्ट फेल देखील होऊ शकते.

शस्त्रक्रिया दरम्यान

शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर देखील फणस टाळले पाहिजे. असे केल्याने तुमच्यासाठी पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. ज्यामुळे अन्न पचवणेही कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत, जे लोक ऑपरेशन करणार आहेत त्यांनी सुमारे दोन आठवडे आधीच फणसाचे सेवन थांबवावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner