मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chakvat Side Effects: या लोकांनी चुकूनही करू नये चाकवतचे जास्त सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

Chakvat Side Effects: या लोकांनी चुकूनही करू नये चाकवतचे जास्त सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 22, 2024 07:30 PM IST

Bathua Side Effects: चाकवत भाजीचे आरोग्यासाठी फायदे असले तरी ते काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. चाकवत भाजीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोणते नुकसान होतात ते जाणून घ्या.

चाकवत भाजीचे साइड इफेक्ट
चाकवत भाजीचे साइड इफेक्ट

Side Effects of Eating Chakvat: बहुतेक लोकांना हिवाळ्यात हिरव्या भाज्या खायला आवडतात. या काळात सरसो, पालक, मेथी, चाकवत अशा अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. तुम्हीही चाकवतची भाजी, पराठा, रायता असे अनेक पदार्थ खाल्ले असतील. चाकवत म्हणजेच बथुआ या हिरव्या भाजीमध्ये फायबर, लोह, पोटॅशियम असे अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. असे असूनही आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या चाकवतचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते तुमच्या आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचवू शकते. चाकवतमध्ये ऑक्सॅलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. जर हे अॅसिड शरीरात जास्त प्रमाणात पोहोचले तर ते कॅल्शियमचे प्रमाण कमी करते. जास्त प्रमाणात चाकवत खाल्ल्याने आरोग्याला काय हानी होते आणि कोणत्या लोकांनी याचे जास्त सेवन करू नये ते जाणून घ्या.

कमजोर पचन

ज्यांची पचनसंस्था खूप कमकुवत आहे त्यांनी चाकवतचे जास्त सेवन करू नये. याचे जास्त सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. खरं तर चाकवतमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, जे कधीकधी एखाद्या व्यक्तीमध्ये अतिसाराचे कारण बनू शकते. मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास त्यात असलेले फायबर व्यक्तीला बद्धकोष्ठता, लोहाच्या कमतरतेपासून मुक्त करते आणि पोट स्वच्छ ठेवते. पण जर तुम्ही आधीच जुलाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर या भाजीचे सेवन करणे टाळा.

कॅल्शियमची कमतरता

जर तुमच्या शरीरात आधीच कॅल्शियमची कमतरता असेल तर चाकवतचे सेवन टाळा. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ लागते. वास्तविक याचे कारण असे आहे की या हिरव्या भाजीमध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते, ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते.

स्किन एलर्जी

स्किन एलर्जीची समस्या असलेल्या लोकांनी सुद्धा चाकवतचे सेवन टाळावे. त्याच्या अतिसेवनाने एलर्जीच्या तक्रारी वाढू शकतात. चाकवतच्या जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे अशा लोकांना त्वचेवर रॅशेस, खाज येणे, पुरळ उठणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

 

प्रजनन क्षमतेवर परिणाम

चाकवत ही हिरवी भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. वास्तविक चाकवत भाजीमध्ये प्रजनन-विरोधी गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल तर चाकवत भाजीचे सेवन मर्यादित करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel