Sugarcane Juice: या समस्या असणाऱ्या लोकांनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस, बिघडू शकते तब्येत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sugarcane Juice: या समस्या असणाऱ्या लोकांनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस, बिघडू शकते तब्येत

Sugarcane Juice: या समस्या असणाऱ्या लोकांनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस, बिघडू शकते तब्येत

Published Apr 04, 2024 02:51 PM IST

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस पिणे चांगले असले तरी काही समस्या असलेल्या लोकांनी हे पिणे टाळले पाहिजे. उसाचा रस पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

Sugarcane Juice: या समस्या असणाऱ्या लोकांनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस, बिघडू शकते तब्येत
Sugarcane Juice: या समस्या असणाऱ्या लोकांनी चुकूनही पिऊ नये उसाचा रस, बिघडू शकते तब्येत (unsplash)

Side Effects of Sugarcane Juice: उन्हाळा सुरू होताच लोकांना अशा गोष्टींचा आहारात समावेश करायला आवडते ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात थंडपणाही कायम राहतो. अशा गोष्टींमध्ये उसाच्या रसाचाही समावेश होतो. उन्हाळा सुरू होताच लोकांमध्ये उसाच्या रसाची मागणीही वाढू लागते. उसाच्या रसामध्ये ऊर्जा, कर्बोदके, खनिजे, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. हे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. असे असूनही काही लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे. या लोकांना उसाचा रस पिल्याने काही फायदा होत नाही पण आरोग्याशी संबंधित अनेक नुकसान होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे.

या समस्या असणाऱ्या लोकांनी उसाचा रस

डोकेदुखी

गरमीपासून आराम देणारा उसाचा रस कधीकधी डोकेदुखी ट्रिगर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर उसाचा रस पिणे टाळा. उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस पिणे टाळावे. उसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि जास्त ग्लायसेमिक लोड (GL) असतो. ज्यामुळे शरीरात रक्तातील साखर वाढू शकते आणि व्यक्ती इतर अनेक आजारांना बळी पडू शकते. यामुळेच मधुमेही रुग्णांनी उसाचा रस पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

पचनसंस्था बिघडू शकते

कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांनी उसाचा रस पिऊ नये. उसाच्या रसात आढळणाऱ्या पॉलिकोसॅनॉलचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पोटदुखीसोबत डायरियाची समस्याही उद्भवू शकते. जर तुमची पचनक्रिया कमजोर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उसाचा रस प्या.

लठ्ठपणा

जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनाने आधीच हैराण असाल तर अशा परिस्थितीत उसाचा जास्त रस पिणे टाळा. उसाचा रस प्यायल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

सर्दी - खोकला

सर्दी-खोकल्याचा त्रास होत असला तरी उसाचा रस पिणे टाळावे. कारण उसाच्या रसाचा प्रभाव थंड आहे. उसाच्या रसाच्या थंड परिणामामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो. उसाचा रस प्यायल्याने व्यक्तीला घसा खवखवणे, श्लेष्मा स्राव इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner