मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  WHO ने प्रथमच तंबाखू सोडण्यासाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, घोषित केली ही प्रभावी औषधे

WHO ने प्रथमच तंबाखू सोडण्यासाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, घोषित केली ही प्रभावी औषधे

Jul 04, 2024 08:15 PM IST

Quit Smoking: प्रथमच डब्ल्यूएचओने निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि ३ औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे.

तंबाखू सोडवण्यासाठी प्रभावी औषधे
तंबाखू सोडवण्यासाठी प्रभावी औषधे (unsplash)

Effective Medicines to Quit Smoking: जागतिक आरोग्य संघटनेने प्रथमच तंबाखू सोडण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामध्ये बिहेवियर सपोर्ट बरोबरच औषध आणि डिजिटल अॅप्स लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करतील. तसे झाल्यास जगभरात तंबाखूमुळे होणारे आजार कमी होण्यास नक्कीच मदत होईल. जगभ रातील १.२५ अब्ज तंबाखू खाणाऱ्या लोकांपैकी सुमारे ७५ कोटी लोक असे आहेत ज्यांना हे व्यसन सोडायचे आहे पण ते यशस्वी होत नाहीत.

तंबाखू सोडण्यास मदत करेल ही थेरपी

- डब्ल्यूएचओने व्हॅरेनिक्लिन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT), बुप्रोपियन आणि सायटोसिन तंबाखू सोडण्यासाठी प्रभावी असल्याचे वर्णन केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

- व्हर्निसिलिन ही एक गोळी आहे ज्यात निकोटीन नसते. हे औषध तंबाखू सोडण्यासाठी वापरले जाते. परंतु हे इतर तंबाखू सोडवणाऱ्या औषधांपेक्षा वेगळे कार्य करते आणि तंबाखू सोडण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी प्रभावी आहे.

- त्याच वेळी सायटोसिनचा वापर बऱ्याच काळापासून तंबाखूविरोधी औषध म्हणून देखील केला जात आहे. बऱ्याच अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की या प्लांट बेस्ट कंपाऊंडचा वापर केल्याने धूम्रपान सोडण्याची शक्यता दुप्पट होते. युरोपमध्ये फार पूर्वीपासून याचा वापर केला जात आहे.

- बुप्रोपियन एक अँटीडिप्रेसस औषध आहे. ज्याचा वापर निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये केला जातो. डब्ल्यूएचओने आता निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये या तीन औषधांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याचा तंबाखूच्या व्यसनातून सुटका होण्यास झपाट्याने परिणाम दिसून येतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel