मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Oral Health : जिभेवर पांढरा थर जमला आहे? या सोप्या पद्धतींनी करा स्वच्छ!

Oral Health : जिभेवर पांढरा थर जमला आहे? या सोप्या पद्धतींनी करा स्वच्छ!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 17, 2024 11:02 AM IST

Tongue Cleaning: आपण अनेक वेळा तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. याशिवाय जिभेवर पांढरा थर जमतो.

White coating on the tongue
White coating on the tongue (freepik)

How to remove white layer from tongue: प्रत्येकाला मोत्यासारखे पांढरे दात हवे असतात त्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते. पण अनेकदा जिभेवर चढलेला पांढरा थर इग्नोर केला जातो. पण हे इग्नोर करू नये. जर तुमच्या जिभेचा रंग सर्वत्र पांढरा किंवा पिवळा होऊ लागला तर ते तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. निरोगी जिभेचा रंग हा फिकट गुलाबी आणि काही अंशी पांढरी असावी. जिभेवर पांढरा थर साचल्याने तोंडात बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे तोंडातून अनेकदा दुर्गंधी येते. यासाठी तोंडाची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. ५ सोप्या पद्धतींच्या मदतीने जिभेच्या पांढरा थरापासून मुक्त होऊ शकता.

जीभ स्क्रॅपरचा वापर

जिभेचा पांढरा थर काढून टाकण्यासाठी जीभ स्क्रॅपर वापरा. यामुळे जीभ सहज स्वच्छ होते. आठवड्यातून २ -३ वेळा स्क्रॅपर वापरा.

Brushing Teeth: तुमची ब्रश करण्याची पद्धत चुकीची तर नाही ना? जाणून घ्या टिप्स

ऑइल पुलिंग

नारळाच्या तेलाने तोंडात ऑइल पुलिंग केल्यास अनेक समस्यांवर मात करू शकता. १-२ चमचे खोबरेल तेल किंचित कोमट करा. आता ते तोंडात घ्या आणि फिरवा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे तोंड निरोगी आणि दुर्गंधीमुक्त राहील.

World Oral Health Day: या सोप्या पद्धतीने राखा ओरल हायजीन, दात आणि हिरड्या राहतील निरोगी

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा

जीभ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याचा वापर करा. कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळा. आता दिवसातून दोनदा या पाण्याने गुळण्या करा. यामुळे जिभेचा पांढरा थर निघून जाईल आणि तोंडातून दुर्गंधीही येणार नाही.

World Oral Health Day: दातांवरील पिवळेपणा नॅचरली दूर करतात हे फळं, ओरल हेल्थसाठीही आहे फायदेशीर

प्रोबायोटिक आहार

रोजच्या आहारात प्रोबायोटिकयुक्त आहार घेतल्यास जिभेवर पांढरा थर येण्यास प्रतिबंध होतो. प्रोबायोटिक आहार तोंडातील बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel