Brown vs white sugar hich sugar is better? सण असो किंवा लग्न-समारंभ, एखादं मिळवलेलं यश असो किंवा मग आनंदाचा प्रसंग. या सर्वात सर्वप्रथम मनात येते ते म्हणजे काहीतरी गोड. या ना त्या कारणाने आपण साखरेचे सेवन करत राहतो. बरेचदा लोक सकाळची सुरुवात साखरेने करतात आणि रात्रही साखरचं खातात. खरं तर, बहुतेक घरांमध्ये, सर्वात आधी प्यायला जातो तो साखर घातलेला चहा आणि रात्रीच्या जेवणानंतर मिठाई घेण्याची अनेकांना सवय असते. पांढऱ्या साखरेचे सेवन करणे सामान्य आहे, परंतु काही लोकांना ब्राऊन साखर खाणे देखील आवडते. रसापासून ब्राऊन आणि पांढरी साखर दोन्ही तयार केली जाते, परंतु या दोन्हीपैकी कोणती साखर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्यांच्यात काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
उसाच्या रसातील पाणी आणि नको असलेलं घटक काढून टाकल्यानंतर सुक्रोज उरते. या स्फटिकरुपाला पांढरी साखर म्हणतात. जे फिल्टर केले जाते. वास्तविक सुक्रोज हा एक घटक आहे जो नैसर्गिकरित्या वनस्पतींमध्ये आढळतो. त्यात ५० टक्के ग्लुकोज आणि ५० टक्के फ्रक्टोज असते.
ब्राऊन साखरेच्या प्रक्रियेबद्दल सांगायचे तर, ही प्रक्रिया न केलेली साखर असते. यामध्ये मोलॅसिस असते आणि त्यामुळे तिचा रंग वाळूसारखा तपकिरी किंवा गडद तपकिरी असतो. ब्राऊन शुगर सुद्धा गुळात मिसळून बनवली जाते आणि दोन्हीच्या चवीत थोडा फरक असतो.
फिटनेस फ्रिक लोक पांढऱ्याऐवजी ब्राऊन शुगरला प्राधान्य देतात. यामागे कारण असे की पौष्टिक मूल्य आणि कॅलरीजच्या बाबतीत ब्राऊन साखरमध्ये थोडे अधिक पोषण असते. लक्षात घ्या याचे प्रमाण देखील तसे कमीच असते. याच कारणांमुळे दोन्ही साखर तसे उत्तम पर्याय नाही. याचा निरोगी पर्यायी शोधला जातो. साखरेऐवजी मध किंवा गूळ वापरू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)