Lakshadweep: परदेशात ट्रिप करायची म्हंटल की सगळ्यात आधी महत्त्वाचं कागदपत्र हवं असतं ते म्हणजे पासपोर्ट. त्यानंतर येते म्हणजे व्हिसा. जर तुमच्याकडे या दोन गोष्टींपैकी एकही नसेल तर तुम्ही परदेशात प्रवास करू शकत नाही. या नियमांबद्दल तुम्हाला माहीतच असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही भारतात काही ठिकाणी गेलात तर तुम्हाला इथेही परमिट लागेल. होय, भारतातच अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावे लागेल. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच लक्षद्वीप भेट दिली. दौऱ्यानंतर लक्षद्वीप गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावे लागेल हे तुम्हाला माहिती आहे का. मात्र केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील अशी अनेक राज्ये आहेत जिथे जाण्यासाठी स्थानिक सरकारची परवानगी घ्यावी लागेल. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल...
तरुणाचं आवडतं ठिकाण म्हणजे लडाख. लडाखच्या काही भागांना भेट देण्यासाठी देखील परवानगी आवश्यक आहे. हनु व्हिलेज, पँगॉन्ग त्सो लेक, त्सो मोरीरी लेक, न्योमा, लोमा बेंड आणि खारदुंग यांसारख्या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी आवश्यक आहेत. तिथले परमिट तुम्ही तुम्ही डीसी ऑफिसमधून घेऊ शकता.
ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशला भेट द्यायचा प्लॅन करत असाल तर तिकडे तुम्हाला इनर लाईन परमिट आवश्यक आहे. अरुणाचल प्रदेशची सीमा चीन, भूतान आणि म्यानमारशी आहे. या कारणास्तव या ठिकणी परवानगी घेणे आवश्यक आहे. तवांग, इटानगर, झिरो, अनिनी आणि भालुकपोंगला भेट देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
नागालँडला भेट देणाऱ्यासाठीही परमिट आवश्यक असते. जर तुम्ही कोहिमा, दिमापूर, मोकोकचुंग, वोखा, सोम आणि फेकला भेट देणार असाल तर तुम्हाला परमिट लागेल. येथे तुम्हाला पॅन कार्ड किंवा मतदार कार्डद्वारे परमिट मिळू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)