मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mysterious Tourist Place: भारतातील या ठिकाणी विज्ञानही झालंय नापास! गूढ अजूनही आहे कायम

Mysterious Tourist Place: भारतातील या ठिकाणी विज्ञानही झालंय नापास! गूढ अजूनही आहे कायम

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 18, 2024 12:18 PM IST

Travel Tips: भारतात सौंदर्यासोबतच अशी काही ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य अगदी विज्ञानालाही कळू शकले नाही. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल.

 Which is the most mysterious hill station in India
Which is the most mysterious hill station in India (freepik)

What is the most mysterious place in India: भारतात अशी अनेक ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहेत, जिथे परदेशी लोकही आवर्जून भेट देतात. ही ठिकाणं सौंदर्याच्या बाबतीत इतर देशांना मागे टाकतात. यासोबत भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे रहस्य विज्ञानालाही समजलेले नाही. या ठिकाणांच्या स्टोरी ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या यादीमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळांच्या नावांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील या रहस्यमय ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांमधील रहस्य अगदी विज्ञानही सोडवू शकलेले नाही. चला अशा ट्रॅव्हल डेस्टिनेशबद्दल जाणून घेऊयात.

भानगड किल्ला

जयपूरपासून ३२ मैल दूर असलेला राजस्थानचा भानगड किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याशी अनेक भूत-प्रेत कथा निगडित आहेत. १७ व्या शतकापासून हा किल्ला पछाडलेला असल्याचे सांगितले जाते. आजही लोकांचा असा विश्वास आहे की येथे भूत आणि पिशाच राहतात.

बर्फाचा प्रवास! बर्फाच्छादित जम्मू-काश्मीरमधील ट्रेनचा मंत्रमुग्ध करणारा viral video एकदा बघाच!

लेपाक्षी मंदिर

देशाचे दक्षिणेकडील राज्य म्हणजे आंध्र प्रदेशचे लेपाक्षी मंदिर अतिशय रहस्यमय आहे. हे मंदिर १६व्या शतकात बांधले गेले होते. या मंदिरात तब्बल ७० खांब आहेत. पण इथे असा एक खांब देखील आहे, जो छताच्या मदतीने हवेत लटकत राहतो.

Maharashtra Travel: महाराष्ट्रातील हे ठिकाण आहे थंडीत भेट देण्यासाठी उत्तम, निसर्गप्रेमींनी आवर्जून जावे!

अजिंठा-एलोरा लेणी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा एलोरा लेणी देखील खूप रहस्यमय मानली जातात. या लेण्यांचा इतिहास ४ हजार वर्षे जुना असल्याचे मानले जाते. अजिंठा येथे सुमारे ३० आणि एलोरामध्ये १२ लेणी आहेत. या खडकाच्या खाली एक शहर देखील वसले आहे असे म्हणतात. डोंगर कापून या गुहा बनवल्या गेल्या होत्या, पण त्यावेळी यंत्रसामग्री नव्हती.

Kashmir: 'दुधाच्या लाटा' काश्मीरच्या बर्फवृष्टीदरम्यान मुलींनी केलं जबरदस्त रिपोर्टिंग, बघा Viral Video

रूपकुंड तलाव

उत्तराखंडच्या या सरोवराविषयी जो कोणी ऐकतो, त्याच्यासमोर मानवी सांगाडे घुमू लागतात. रूपकुंड तलाव हे उत्तराखंडमधील सर्वात प्रसिद्ध तलाव आहे. जमिनीपासून या तलावाची उंची ५०२९ मीटर आहे. या तलावाभोवती अनेक मानवी सांगाडे दिसतील.

Mount Everest : माउंट एव्हरेस्टचे ३६० डिग्री दृश्य होतोय Viral, बघा मंत्रमुग्ध करणारा Video

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel

विभाग