मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Colour of The Year 2024: २०२४ चा आहे हा रंग, जाणून घ्या कोण निवडतं कलर ऑफ द इयर!

Colour of The Year 2024: २०२४ चा आहे हा रंग, जाणून घ्या कोण निवडतं कलर ऑफ द इयर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 02, 2024 11:29 AM IST

Pantone Colour 2024: २०२४ वर्षाचा रंग जाहीर झाला आहे. हा रंग नक्की कोणता आहे आणि याची निवड कोण करतं ते जाणून घेऊयात.

which is colour of the year 2024 by pantone
which is colour of the year 2024 by pantone (freepik)

Pantone Colour of The Year 2024: दरवर्षी वर्षाच्या सुरुवातील कलर ऑफ द इयर अर्थात वर्षाचा रंग जाहीर केला जातो. हा रंग ग्लोबल ते लोकल सगळीकडेच वापरला वाजतो. तसाच २०२४ वर्षासाठीचाही रंग जाहीर झाला आहे. पण आधी प्रश्न पडतो की हा रंग जाहीर कोण करते ते. तर पॅन्टोन ही रंगाची कंपनी कंपनी हा रंग जाहीर करते. ही कंपनी ट्रेंडचे विश्लेषण करून दरवर्षी नवीन वर्षाचे रंग घोषित करते. यंदा २०२४ वर्षासाठी सौम्य आणि सुंदर रंगाची घोषणा कंपनीने केली आहे. या वर्षी आपण मानवी संघर्षाची दृश्ये जवळून पाहिली आणि म्हणूनच, मानवी करुणेचे प्रतीक मानून, पॅन्टोनने पीस फज (Peach Fuzz) रंगला २०२४ चा कलर ऑफ द इयर म्हणून घोषित केला गेला आहे. याबद्दल जाणून सविस्तर जाणून घेऊयात.

पीस फज रंगाचा अर्थ

कामुक (सेंशुअल) सौम्य रंग म्हणजे पीच फज. या रंगाचा नंबर आहे १३-१०२३ हा आहे. या रंग दयाळूपणा आणि प्रेमळपणाच्या भावनांशी संबंधित आहे. हा रंग काळजी, शेअरिंग आणि समर्थनाचा संदेश देतो. हा एक उबदार आणि आरामदायी रंग आहे जो एकजुटपणाही दर्शवतो.

का आहे हा रंग खास?

पीच फज हा एक हलका, फ्रूटी टोन असलेला रंग आहे. या रंगाकडे बघितल्यावर शांतता वाटते. पॅन्टोन कलर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष लॉरी प्रेसमन यांच्या म्हणण्यानुसार, "आपण आपल्या आयुष्यात खूप उलथापालथ करत असतो. म्हणूनच आपल्याला करुणेचे प्रतीक असलेल्या रंगाची गरज आहे. अशा जगात जे बऱ्याचदा उत्पादकता आणि बाह्य पलब्धियोवर जोर देते. आपण आपल्या इनर सेल्फची काळजी घेणे आणि त्याचे महत्त्व ओळखणे महत्वाचे आहे. आधुनिक जीवनाच्या गर्दीत विश्रांती, सर्जनशीलता आणि मानवी कनेक्शनचे क्षण शोधले पाहिजेत."

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel