Skin care tips: काहींना बारीक गाल आवडतात तर काहींना गुबगुबीत गाल आवडतात. गुबगुबीत गाल तुम्हाला हवे आहेत? तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हीही तुमचे गाल सुंदर आणि गुबगुबीत बनवू शकता. काही पद्धतींना फॉलो केल्याने गाल गुबगुबीत होतील. तुमचे गाल गुबगुबीत करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. यासाठी बाहेरची उत्पादने वापरण्याची गरज नाही. तुम्ही आहारात काही बदल करून गुबगुबीत गाल मिळवू शकता. तुम्हाला फक्त आहारात काही फळांचा समावेश करायचा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
सफरचंद हे फळ किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीतच आहे. हे फळ खाल्ल्याने तुमचे गाल गुबगुबीत दिसू शकतात. याशिवाय हे तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे. तुम्ही सफरचंदाचा जाम बनवूनही खाऊ शकता. चवीलाही हे जास्त टेस्टी लागते.
बीटरूट देखील गालांसाठी उत्तम आहे. हे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.
डाळिंबात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. याचा फायदा तुमच्या त्वचेला होईल. हे तुमची त्वचा घट्ट करण्याचे काम करते, ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. या फळामध्ये फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा -६ फॅटी ऍसिड घटक आढळतात.
द्राक्षे हे देखील त्वचेसाठी खूप चांगले आहे. यातील व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेची चमक चौपट करते.
गाजर तुमच्या त्वचेसाठीही चांगले आहे. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)