Home Remedies: झोप आपल्या शरीरासाठी फार गरजेचे आहे. झोप पूर्ण नाही झाली (how to get rid of insomnia) तर अनेक समस्या होतात. ज्या व्यक्तीची झोप पूर्ण होत नाही त्याचा संपूर्ण दिवस चांगला जात नाही. कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित होत नाही. याउलट पुरेशी झोप झाल्यास कामात एकाग्रता राहते आणि शरीराला विश्रांतीही मिळते. झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकांना झोप येत नाही तर, अनेक लोक असे असतात ज्यांना दिवसा खूप झोप येते पण रात्री झोप कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर तुम्ही घरीच उपाय करू शकता. तुम्ही काही पेयांचे सेवन करू शकता. या पेयांचे सेवन केल्यावर झोप येण्यास मदत होते. यामुळे झोपेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
बदाम दूध तुम्ही आवर्जून प्यायला असाल. रात्री बदामाचे दूध प्यायल्याने झोप चांगली येते. बदामाचे दूध सेरोटोनिन वाढवते. हे झोपेसाठी उपयुक्त असते. बदामाचे दूध तुम्ही कोमट करून प्यावे.
झोप येण्यास मदत करणारे दुसरे पेय म्हणजे कॅमोमाइल चहा. हा चहा कॅफीन मुक्त पेय आहे. याचे सेवन नैसर्गिक झोपेचे एजंट म्हणून कार्य करते. म्हणूनच दररोज रात्री कॅमोमाइल चहा घेतल्यास झोप छान येईल.
हळदीच्या दुधाच्या सेवनाचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहेच. हे दूध झोपेची गुणवत्ता वाढवते. चांगली झोप येण्यासाठी हे दूध प्यायले जाऊ शकते. हे दूध बनवण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळा. हलकेसे उकळून घ्या. यामध्ये लवंग, दालचिनी आणि जायफळ देखील घाला. हे दूध प्यायल्यानंतर काही वेळाने चांगली झोप येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)