मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  London of India: या शहराला म्हणतात 'भारताचे लंडन', जाणून घ्या कशी करायची ट्रिप प्लॅन!

London of India: या शहराला म्हणतात 'भारताचे लंडन', जाणून घ्या कशी करायची ट्रिप प्लॅन!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 21, 2024 01:57 PM IST

Travel Tips: कोणत्या शहराला भारताचे लंडन म्हणतात याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला, हे कोणते ठिकाण आहे आणि तिथे कशी भेट द्यायची ते जाणून घेऊयात.

Interesting Places Of India
Interesting Places Of India (Freepik)

which city is London of India: भारतात अनेक फिरण्याची ठिकाणं आहेत. भारत हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशातील टुरिस्ट प्लेसेसची वेगवगेळी खासियत आहेत. भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर आपण दुसऱ्या देशात आहोत असं वाटतं. अशीच एक जागा आहे जी लंडन सारखी दिसते. कोलकाता शहराला भारताचे लंडन म्हटले जाते. हे संपूर्ण शहर बऱ्याच काळापासून ब्रिटीश साम्राज्याची राजधानी होती हे सगळ्यांचं माहित आहे. याच कारणांमुळे अनेक गोष्टी लंडनसारख्या वाटतील. कोलकाता ही ब्रिटीश भारताची राजधानी असल्याने, कोलकात्याच्या बहुतेक हेरिटेज इमारती आणि चर्च लंडनप्रमाणेच ब्रिटिशांनी बांधल्या किंवा डिझाइन केल्या आहेत. खरं तर, तुम्हाला प्रत्येक रस्त्यावर ब्रिटिश आणि स्कॉटिश वास्तुशिल्पीय इमारत सापडेल जी तुम्हाला लंडनची अनुभूती देईल. तर, या शहरात तुम्ही कुठे भेट देऊ शकता, याबद्दल जाणून घेऊयात.

हावडा ब्रिज

हावडा ब्रिज हे नाव ऐकलं की कोलकत्ता शहराचं नाव समोर येतंच. हा ब्रिज हुगळी नदीवरील एक मोठा स्टील पूल आहे. हा जगातील सर्वात लांब कॅन्टिलिव्हर पुलांपैकी एक मानला जातो. रवींद्र सेतू म्हणूनही ओळखले जाते, ते हावडा आणि कोलकाता यांना जोडते. दररोज १००,००० वाहने आणि असंख्य चालणारी लोक यावरून जातात. या ब्रिजबद्दल असे म्हटले जाते की तो बांधण्यासाठी एकही नट किंवा स्क्रू वापरण्यात आलेला नाही. हा ब्रिज अगदी लंडन ब्रिज सारखा दिसतो.

Maharashtra Travel: महाराष्ट्रातील हे ठिकाण आहे थंडीत भेट देण्यासाठी उत्तम, निसर्गप्रेमींनी आवर्जून जावे!

व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल

व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल ही भव्य पांढरी संगमरवरी रचना असलेली एक सुंदर इमारत आहे. या हॉलची वास्तुकला भव्य आहे. कोलकाता मधील सर्वात जास्त फोटो काढलेल्या ठिकाणांपैकी एक, या मेमोरियल हॉलच्या आत एक अतिशय छान संग्रहालय आहे. ब्रिटीश काळातील व्यक्तींची चित्रे, उत्तम शिल्पे आणि इतर चित्रे आणि त्या काळात वापरण्यात आलेली काही शस्त्रे यांनी हे संग्रहालय भरलेले आहे.

दक्षिणेश्वर काली मंदिर

कोलकत्तामधील दक्षिणेश्वर काली मंदिर देवी कालीला समर्पित आहे. हुगळी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर २५ एकर परिसरात पसरले आहे. मुख्य मंदिर हे नऊ-स्पायर्ड रचना आहे आणि त्याच्या भोवती असलेल्या खोल्या प्रशस्त आहेत. नदीच्या काठावर, भगवान शिवाला समर्पित सुमारे १२ मंदिरे आहेत, तसेच भगवान कृष्ण आणि देवी राधा यांचे मंदिर आणि राणी राश्मोनीचे मंदिर आहे, ज्यांनी हे मंदिर बांधले आहे असे मानले जाते. ती देवी कालीची मोठी भक्त होती. हे मंदिर रामकृष्णाशी संबंधित असल्याचेही समजते.

मदर तेरेसा यांचे घर

मदर तेरेसा यांनी कोलकत्तामधील हे घर १९५० मध्ये मानवजातीची निस्वार्थ सेवा करण्यासाच्या उद्देशाने बांधले होते. त्यांनी त्याच घरात शेवटचा श्वास घेतला. १९५३ ते १९९७ या काळात त्या या घरात राहिलय आणि कामही केले. त्यामुळे जगभरातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. तर, अशा प्रकारे तुम्ही कोलकात्यातील या ठिकाणांना भेट देऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग