Tourist Jail In India: भारतातील या तुरुंगात तुम्ही कैद्याप्रमाणे नव्हे तर पर्यटकाप्रमाणे भेट देऊ शकता!-which are the largest tourist jail in india for travel ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tourist Jail In India: भारतातील या तुरुंगात तुम्ही कैद्याप्रमाणे नव्हे तर पर्यटकाप्रमाणे भेट देऊ शकता!

Tourist Jail In India: भारतातील या तुरुंगात तुम्ही कैद्याप्रमाणे नव्हे तर पर्यटकाप्रमाणे भेट देऊ शकता!

Mar 03, 2024 02:59 PM IST

Largest prison in India: गुन्हा केल्यानंतर तुरुंगात जाणे ही वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही प्रवासाच्या उद्देशानेही तुरुंगात जाऊ शकता? होय. कसं ते जाणून घेऊयात.

 5 jail in India where you can travel as tourist
5 jail in India where you can travel as tourist (Freepik)

Travel Tips: आपल्यातला कोणालाच तुरुंगात जायचं नाहीये. कधीच हा अनुभव यावा असं कोणालाही वाटतं नाही. पण तुम्हाला असं सांगितलं तर की तुम्हाला कोणताही गुन्हा न करता तुरुंगात जाता येईल तर? होय. गुन्हा केल्यानंतर तुरुंगात जाणे ही वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही तुम्ही प्रवासाच्या उद्देशानेही तुरुंगात जाऊ शकता. भारतात असे काही तुरुंग आहेत जिथे तुम्ही कोणताही गुन्हा न करता जाऊ शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात काही तुरुंग आहेत जेथे तुम्ही एखाद्या पर्यटकाप्रमाणे फिरायला किंवा भेट देऊ शकता आणि त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेऊ शकता कैदी म्हणून नाही. ही ठिकाणे त्यांच्या इतिहासासाठी आणि मनोरंजक कथांसाठी ओळखली जातात. इथे तुम्हाला स्वातंत्र्याच्या अनेक कहाण्या कळतील, त्यासोबतच देशाला स्वतंत्र करण्यात कोणत्या लोकांनी मदत केली हेही कळेल. भारतातील त्या तुरुंगांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्याशी भारताचा रंजक इतिहास निगडीत आहे.

येरवडा जेल, पुणे, महाराष्ट्र

दक्षिण आशियातील सर्वात मोठे कारागृह म्हणून ओळख असलेल्या येरवडा जेल तुम्ही भेट देऊ शकता. भारताच्या इतिहासात याला विशेष महत्त्व आहे. हे १८३१ मध्ये ब्रिटीश शासकांनी बांधले होते, जिथे महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय क्षण घालवले. गांधी आणि टिळकांच्या नावाचा एक फाशी कक्षही आहे.

Long Weekend Travel: या महिन्याच्या लॉंग विकेंडला करा महाराष्ट्रातील या बीचला भेट देण्याचा प्लॅन!

संगारेड्डी जेल, हैदराबाद

हैद्राबादमधलं हे जेल २२० वर्षे जुने आहे. संगारेड्डी तुरुंग हैदराबादमध्ये आहे जे आता संग्रहालयात रूपांतरित झाले आहे. हे जेल १९७६ मध्ये बांधण्यात आले होते. आता हे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी एक संग्रहालय म्हणून खुले करण्यात आले आहे, जिथे तुम्ही 'फील द जेल' योजनेअंतर्गत कारागृहाला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. या प्लॅन अंतर्गत तुम्ही २४ तास तुरुंगात घालवू शकता.

Travel: हनिमूनसाठी भारतातील ही ठिकाणे आहेत सर्वोत्तम!

सेल्युलर जेल, पोर्ट ब्लेअर

हे जेल, काळा पानी नावानेही प्रसिद्ध आहे. हे जेल भारताचा प्राचीन इतिहास निगडीत आहे. तुम्हाला इथे बटुकेश्वर दत्त आणि वीर सावरकर या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याबद्दल माहिती मिळेल. आता हे कारागृह पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून, दररोज संध्याकाळी त्यांच्यासाठी लाइट आणि म्युझिक शोचे आयोजन केले जाते. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत तुम्ही येथे भेट देण्यासाठी येऊ शकता.

Travel: हे सुंदर ठिकाण पर्वतांची राणी म्हणून जाते ओळखले, आवर्जून द्या भेट!

वाइपर बेट, अंदमान

हे सेल्युलर जेलसारखे लोकप्रिय नाही परंतु भारताच्या प्राचीन इतिहासाशी संबंधित अनेक कथा आहेत. त्यावेळच्या सत्ताधीशाच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला शिक्षेसाठी इथे पाठवले जात असे. आता हे बेट सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे पण तरीही त्याच्या हिरव्यागार दऱ्यांमध्ये अनेक कथा दडलेल्या आहेत.

विभाग