How to enhance facial glow: चेहरा हा आपल्या शरीराचा महत्त्वपूर्व भाग आहे. हाच भाग असा आहे जो सर्वाना लगेच दिसतो. यामुळे याची विशेष काळजी घ्यावी लागते. केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील याकडे विशेष लक्ष देतात. यासाठी विविध प्रकारचे फेस पॅक आणि क्रीम वापरल्या जातात. चेहरा ठीक ठेवण्यासाठी महागडे पार्लर उपचार देखील घेतले जातात. परंतु अनेक वेळा ते खूप मेहनत घेऊनही त्याचे परिणाम दिसून येत नाहीत. चेहरा उजळण्यासाठी सर्व उपाय करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आम्ही एक अशी टीप घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वेळात चमकदार आणि तरुण त्वचा मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी स्वयंपाकघरात असलेल्याच गोष्टी आपण वापरू शकतो. स्किन केअर बद्दल डॉ. निरंजन सामानानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्वचा आणि केसांच्या काळजीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. अलीकडेच्या एका पोस्टमध्ये त्यांनी एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल जेल मिसळून कसं वापरावं याबद्दल सांगितलं आहे.
> यासाठी कोरफडीच्या ताज्या पानांपासून जेल काढा. तुमच्याकडे कोरफड उपलब्ध नसेल तर बाजारात मिळत असलेलं रेडीमेड एलोवेरा जेल देखील वापरू शकता.
> एका व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे जेल काढा आणि त्यात मिसळा. तुम्ही कोणत्याही फार्मसीमधून व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेऊ शकता.
> दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून चेहऱ्याला लावा.
> ते कोरडे झाल्यानंतर धुवा. झोपण्यापूर्वी याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल. रात्रभर राहू द्या आणि सकाळी सामान्य पाण्याने धुवा.
> हा फॉर्म्युला रोज वापरा.
> आठवडाभरात तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसू लागेल.
जरी हा फॉर्म्युला प्रत्येक त्वचेवर प्रभावी आहे, तरीही एकदा पॅच चाचणी करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या