मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dry Fruits: तुम्ही सकाळी हे २ ड्रायफ्रूट्स खाता का? आरोग्याला पोहचू शकते हानी!

Dry Fruits: तुम्ही सकाळी हे २ ड्रायफ्रूट्स खाता का? आरोग्याला पोहचू शकते हानी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 08, 2024 09:22 AM IST

Facts About Dry Fruits: काही ड्रायफ्रुट्स आहेत जे सकाळी खाऊ नयेत. अशा दोन ड्राय फ्रुट्सबद्दल जाणून घेऊयात.

Do not eat these 2 dry fruits in morning
Do not eat these 2 dry fruits in morning (Freepik)

Healthy Eating: ड्राय फ्रुट खाणे किती महत्त्वाचे आहे हे माहीतच आहे. रोजच्या आहारात सुका मेवा अर्थात ड्राय फ्रुट खाणे आरोग्यास महत्त्वपूर्ण ठरते. अनेकजण सकाळी ड्राय फ्रुट खातात. बदाम, काजू, मनुका, अक्रोड, खजूर इत्यादी बहुतेक लोक भिजवून खातात. पण असे काही ड्रायफ्रुट्स आहेत जे सकाळी खाऊ नयेत. आज आम्ही त्या दोन ड्राय फ्रुटबद्दल सांगणार आहोत, जे सकाळी खाऊ नये.

कोणते ड्राय फ्रुट खाऊ नये?

ड्रायफ्रूट्समध्ये रेगुलर फळांपेक्षा तिप्पट जास्त फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पण सकाळी काही ड्रायफ्रूट्स टाळावेत.

> सकाळी मनुका खाणे टाळावे. सकाळी हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. जास्त मनुके खाल्ल्याने दातांनाही नुकसान होऊ शकते. म्हणून, ते मर्यादित प्रमाणातच खा.

> रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या किंवा पोट खराब होऊ शकते.

> सुका मेवा खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते भिजवून घेणे. यामुळे ते पचण्यास सोपे जाते.

> खजूर देखील सकाळी खाऊ नये.

हे ड्राय फ्रुट्स खा

> बदाम सकाळी आवर्जून खा. हे तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवतात. रात्रभर भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. बदामामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते.

> अक्रोड भिजवल्याने त्यांचा पोत मऊ होतो. हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे. ओमेगा -३ केवळ तुमची चयापचय वाढवत नाही तर भूक नियंत्रित करण्यास, जास्त खाणे टाळण्यास आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel