Surya Grahan 2024 Live: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार आणि लाईव्ह कुठे पाहायचं? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Surya Grahan 2024 Live: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार आणि लाईव्ह कुठे पाहायचं? जाणून घ्या

Surya Grahan 2024 Live: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार आणि लाईव्ह कुठे पाहायचं? जाणून घ्या

Apr 05, 2024 05:36 PM IST

Solar Eclipse 2024: यंदाच्या वर्षाचं पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे.

Where watch first solar eclipse of the year
Where watch first solar eclipse of the year (REUTERS)

Solar Eclipse 2024 where to watch: सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे फार स्पेशल असते. अनेकांना हे बघायचं असते. यंदा वर्षातील पाहिलं सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी विशेष मानले जाते कारण सूर्यग्रहण दरम्यान आकाशात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे. यावेळी चंद्राच्या विशेष स्थितीमुळे हे गेल्या ५ दशकांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण जगातील सर्व देशांमध्ये पाहता येईल, पण जे लोक ग्रहण प्रभावित भागात राहत नाहीत त्यांना हे ग्रहण कसे दिसेल? जाणून घेऊयात.

'इथे' बघा ग्रहण लाईव्ह

जर तुम्ही जगाच्या अशा भागात राहत असाल जिथे ग्रहण दिसणार नाही, तर काळजी करू नका. ही आश्चर्यकारक खगोलीय घटना तुम्ही सहज पाहू शकता. हे सूर्यग्रहण अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या वेबसाइटवर लाईव्ह दाखवले जाणार आहे. याशिवाय तुम्ही नासाच्या यूट्यूब चॅनलवरही हे ग्रहण पाहू शकता. हे लाइव्ह स्ट्रिमिंग ८ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ९ एप्रिल रोजी सकाळी १.३० पर्यंत होईल. या काळात ग्रहण वेगवेगळ्या ठिकाणांहून दाखवले जाईल. याशिवाय नासाच्या तज्ज्ञांचे संभाषणही तुम्हाला पाहता येईल.

Travel Tips: जपानने भारतीय पर्यटकांसाठी सुरु केलाय ई-व्हिसा, जाणून घ्या प्रोसेस!

किती वाजता दिसणार सूर्यग्रहण?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल रोजी रात्री ९.१२ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १.२५ वाजता संपेल. त्यावेळी भारतात रात्र असेल. मात्र या ग्रहणाचा प्रभाव अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या विविध भागात काही तास दिसणार आहे.

Snow Fall In Summer: एप्रिल, मे महिन्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे? इथे ट्रिपचा प्लॅन करा!

हे सूर्यग्रहण कुठे दिसणार?

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने म्हटले आहे की ८ एप्रिल २०२४ रोजी संपूर्ण सूर्यग्रहण मेक्सिको, यूएसए आणि कॅनडातून उत्तर अमेरिकेतून जाईल. दरम्यान, हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, कॅनडा, इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे. ते भारतात दिसणार नाही. असे सूर्यग्रहण १९७१ साली दिसल्याचे बोलले जात आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner