मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mini Tibet In India: भारतात 'इथे' आहे मिनी तिबेट, सौंदर्य बघण्यासाठी विकेंडला करा ट्रिप प्लॅन!

Mini Tibet In India: भारतात 'इथे' आहे मिनी तिबेट, सौंदर्य बघण्यासाठी विकेंडला करा ट्रिप प्लॅन!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 27, 2024 03:09 PM IST

Traveling Tips: भारतात अशी काही ठिकाणं आहेत जी अगदी विदेशातील पर्यटन स्थळांप्रमाणे आहेत.

Chandragiri Mini Tibet
Chandragiri Mini Tibet (freepik)

Odisha Travel: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात असंख्य पर्यटन स्थळ आहे. आपल्या देशात विविध धर्माचे लोक मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने एकत्र राहतात. आपल्या भारतातील प्रत्येक राज्य एकमेकांपेक्षा वेगळं आणि सुंदर आहे. आपल्याकडे अशी अनेक ठिकाणे आहेत जी सौंदर्याच्या बाबतीत परदेशातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना टक्कर देतात. काही ठिकाणे त्यांच्या अनोख्या नावांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही ठिकाणं तिकडच्या सौंदर्यामुळे. भारतात एक राज्य आहे ज्याला मिनी तिबेट असेही म्हणतात. हे राज्य आपल्या सौंदर्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे, चला जाणून घेऊया भारताच्या या मिनी तिबेटबद्दल.

कुठे आहे मिनी तिबेट?

भारतातील ओडिशा राज्यातील सुंदर शहरात असलेले चंद्रगिरीला मिनी तिबेट म्हणतात. हे एक असे ठिकाण आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. हे ठिकाण पर्वत आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येत्या लॉंग विकेंडला तुम्हाला भारतातील हा छोटा तिबेट पाहायचा असेल, तर अजून सविस्तर जाणून घ्या.

Travel Tips: नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेलं हे भेट पंतप्रधानाही आवडतं, तुम्ही करा ट्रिप प्लॅन!

भारताचे मिनी तिबेट-चंद्रगिरी

चंद्रगिरी हे ओडिशातील गजपती जिल्ह्यात आहे. याला बरेच लोक जिरंग नावाने देखील ओळखतात. चंद्रगिरीला भारताचे मिनी तिबेट म्हटले जाते कारण येथील निम्म्याहून अधिक लोकसंख्येमध्ये तिबेटी लोक राहतात. म्हणूनच इथे गेल्यावर तिबेटमध्ये आल्यासारखे वाटते. हे ओडिशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या चंद्रगिरीमध्ये सुंदर हिरवळ आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर डोंगराच्या कुशीत वसलेल्या चंद्रगिरीला लोक शांततेचे क्षण जगण्यासाठी येतात. धार्मिक स्थळे पाहण्याची आवड असलेल्या लोकांनाही हे ठिकाण आवडते कारण येथे अनेक ऐतिहासिक बौद्ध मठ आहेत. चंद्रगिरी बौद्ध मठात भगवान बुद्धांची सुमारे २३ फूट उंचीची कांस्य मूर्ती स्थापित आहे.

Travel Tips: भारतातील 'या' ठिकाणी तुम्ही ढगांना करू शकता स्पर्श!

या ठिकाणांनाही द्यायची आहे भेट

ओडिशा हे भारतातील सुंदर आणि अतिशय आकर्षक राज्यांपैकी एक आहे. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरे आणि पर्यटनस्थळे ओडिशाच्या सौंदर्यात भर घालतात. तिथे तुम्ही केवळ मिनी तिबेटच नाही तर जगन्नाथ पुरी मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, चिल्का तलाव आणि उदयगिरी आणि खंडगिरीच्या लेण्यांनाही भेट देऊ शकता. दरवर्षी हजारो पर्यटक ओडिशामध्ये फिरण्यासाठी येतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग