Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस-when is mothers day know the date history and significance ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस

May 06, 2024 09:12 PM IST

Mother's Day 2024 Date: वर्षभर अनेक दिवस साजरे केले जातात. पण मदर्स डे हा सर्वात खास दिवस आहे. मदर्स डे कधी साजरा केला जातो आणि हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस
Mother's Day 2024: यावर्षी कधी आहे मदर्स डे? जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस (unsplash)

History and Significance of Mother's Day: आई होणे ही या जगात एक सुंदर भावना आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात आई होण्याचा आनंद हवा असतो. आईच्या प्रेमाची आणि त्यागाची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी मातृदिन (mother's day) साजरा केला जातो. मुले नेहमी या दिवसाची वाट पाहत असतात आणि मदर्स डे सुरू होताच ते आपल्या आईला विशेष वाटावे यासाठी प्रयत्न करू लागतात. या वर्षी मदर्स डे कधी साजरा केला जाईल आणि हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तर मग येथे जाणून घ्या

मदर्स डे २०२४ कधी आहे? (Mother's Day Date) 

प्रत्येक मूल मदर्स डेची वाट पाहत असतो. या दिवशी तो आपल्या आईला विशेष वाटण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. २०२४ मध्ये रविवारी १२ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाईल.

का साजरा केला जातो मदर्स डे? (Mother's Day Significance)

मदर्स डे साजरा करण्याचा उद्देश मातांच्या निस्वार्थ प्रेम, समर्थन आणि बलिदानाबद्दल प्रेम, कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. ज्यामध्ये सहसा आईबद्दल असलेले स्नेह दाखवण्यासाठी फुलं, कार्ड आणि मॅसेजसोबतच गिफ्ट दिले जातात. संपूर्ण कुटुंब आणि समाज घडवण्यात मातांनी बजावलेली अत्यावश्यक भूमिका साजरी करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे.

कशी झाली मदर्स डेची सुरुवात? (Mother's Day History)

आधुनिक युगात मदर्स डेला ॲना जार्विस या अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्याने पाठिंबा दिला होता. खरं तर १९०५ मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांनी मातांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सुट्टीची स्थापना करण्यासाठी मोहीम चालवली. लोकांना त्यांच्या आईबद्दल त्यांचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिला एक दिवस तयार करायचा होता. अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी १९१४ मध्ये प्रत्येक मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून घोषित करण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानंतर जगभरातील विविध देशांनी मदर्स डे स्वीकारला आहे.

 

Whats_app_banner