Wheat Allergy Care Tips : अन्न केवळ व्यक्तीचे पोट भरत नाही, तर शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्वे देखील पुरवते. संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. पण, जर हा आहार शरीरासाठी चुकीचा ठरला तर रोगप्रतिकारक शक्तीत बिघाड होऊन, फूड अॅलर्जीदेखील होऊ शकते. सामान्यत: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बॅक्टेरिया, विषाणू किंवा इतर विषारी पदार्थांपासून शरीराचे संरक्षण करते. पण काही वेळा काही पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती बिघडते. ज्यामुळे शरीरात विकार निर्माण होऊ लागतात. ज्याला फूड अॅलर्जी म्हणतात.
गव्हामध्ये असलेल्या ग्लोब्युलिन, ग्लियाडिन, अॅल्ब्युमिन आणि प्रोटीनमुळे काही लोकांना अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. सेलिआक रोगात, गव्हामध्ये असलेल्या ग्लूटेनमुळे एखाद्या व्यक्तीस अॅलर्जी होते. हे टाळण्यासाठी डॉक्टर त्या व्यक्तीला गव्हाऐवजी इतर धान्य खाण्याचा सल्ला देतात.
ड्रिंक्स : काही पेयांमध्ये ग्लूटेन असते हे फार कमी लोकांना माहीत आहे. अशा वेळी गव्हापासून बनवलेली बिअर आणि इतर अल्कोहोलयुक्त पेयांचे सेवन करू नये. याशिवाय बाटलीबंद वाइन, आधीपासून तयार केलेली कॉफी आणि ड्रिंक्समध्येही ग्लूटेन असू शकतो.
मसाले : ग्लूटेन बऱ्याचदा सोया सॉस, केचअप, व्हिनेगर, बारबेक्यू सॉस सारख्या गोष्टींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असते, जे पोटात पोहोचल्यावर ग्लूटेन एलर्जीस कारणीभूत ठरू शकते.
बेक्ड पदार्थ : कुकीज, पेस्ट्री, केक आणि डोनट्स यासारख्या बेक्ड पदार्थांमध्ये बऱ्याचदा गव्हाचे पीठ असते, ज्यामुळे गव्हाची अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी समस्या उद्भवू शकतात.
प्रोसेस फूड : गव्हाची अॅलर्जी असलेल्या लोकांनी गव्हापासून बनवलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नयेत. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये बर्गर, चीज, मांस, आईस्क्रीम आणि फ्रेंच फ्राइज सारख्या पदार्थांचा समावेश आहे, ज्यात ग्लूटेन असते, ज्यामुळे गव्हाची अॅलर्जी असणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते.
ब्रेड आणि व्रॅप्स : पांढरा ब्रेड, गव्हाचा ब्रेड, टॉर्टिला आणि इतर प्रकारच्या ब्रेड आणि व्रॅप्समध्ये ग्लूटेन असते, ज्यामुळे ग्लूटेन अॅलर्जी असलेल्या लोकांची समस्या वाढते.
संबंधित बातम्या