Pregnancy: गरोदरपणात प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी काय लक्षात ठेवावे?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy: गरोदरपणात प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी काय लक्षात ठेवावे?

Pregnancy: गरोदरपणात प्रवास करताना सुरक्षित राहण्यासाठी काय लक्षात ठेवावे?

Published Dec 26, 2023 08:13 PM IST

Travel Tips for Pregnant Women: गरोदरपणात प्रवास करणे टाळले पाहिजे असं सांगितले जाते. परंतु आवश्यक असल्यास प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

 pregnant women travel tips
pregnant women travel tips (Freepik)

Pregnant Women Traveling Tips: गर्भधारणेचा टप्पा हा कोणत्याही स्त्रीसाठी आनंदाचा आणि नाजूक असा काळ असतो. यावेळी, प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान प्रवास करताना फारच काळजी घ्यावी लागते. या काळात लांब अंतरासाठी प्रवास करणे कठीण ठरते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रवास करणे विशेषतः टाळावे. यानंतरही लांबचा प्रवास करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ट्रेन असो, बस असो, खाजगी वाहन असो किंवा विमान असो, गरोदरपणात प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्हाला गरोदरपणात विमानाने प्रवास करायचा असेल तर तिकीट काढण्यापूर्वी एअरलाइन्सकडून जाणून घ्या की प्रेग्नंट असताना ट्रॅव्हल करायचे नियम आहेत. ३६ व्या आठवड्यापर्यंत विमान प्रवास सुरक्षित मानला जात असला तरी विमान कंपन्यांचे नियम वेगळे असू शकतात. इतर कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊयात.

औषधे सोबत ठेवा

गर्भधारणेदरम्यान, अनेकदा उलट्या, मळमळ आणि चक्कर येणे यासारख्या समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सांगितलेली औषधे सोबत ठेवा. यामुळे प्रवासादरम्यान कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

आरामदायक उशी

प्रवास करताना तुम्ही तुमच्यासोबत आरामदायी कुशन किंवा उशी ठेवा. कारण गरोदरपणात थोडा वेळ बसल्याने पाठदुखी होते. याच्या मदतीने तुम्ही उशीवर टेकून आरामात बसू शकता.

आरामदायक सीट

गरोदरपणात खूप आरामाची गरज असते, त्यामुळे ट्रेन किंवा विमानात अशी सीट ठेवण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे आरामात ट्रॅव्हल करू शकाल. यामुळे शरीराला विश्रांती मिळेल.

सोबत खाऊ ठेवा

तुम्ही ट्रेन किंवा बसने प्रवास करत असाल तर तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या आणि प्रवासादरम्यान बाहेरचे अन्न खाणे टाळा. सोबत हेल्दी पदार्थ ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner