मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bee Attack: मधमाशांचा हल्ला झाल्यास नेमकं काय करावं? जाणून घ्या हे चार फायद्याचे उपाय

Bee Attack: मधमाशांचा हल्ला झाल्यास नेमकं काय करावं? जाणून घ्या हे चार फायद्याचे उपाय

Aarti Vilas Borade HT Marathi
May 26, 2024 04:35 PM IST

Bee Attack: मधमाशांचा हल्ला झाल्यावर अनेकदा काय करावे हे सुचत नाही. अशावेळी नेमकं काय करावे चला जाणून घेऊया...

मधमाशांचा हल्ला झाल्यास नेमकं काय करावं?
मधमाशांचा हल्ला झाल्यास नेमकं काय करावं?

खेड्यापाड्यात झाडांवर किंवा शहरांमधील इमारतींच्या मधोमध मधमाशांनी आपले पोळे तयार केलेले असते. त्याची तक्रार नगर पालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये केली जाते. पण अनेकदा या माश्या माणसांवर हल्ला करताना दिसतात. मधमाशांनी हल्ला केल्यावर अंगावर पुरळ उठते आणि तेवढा भाग जळतो. या वेदना नेहमी असहय्य असतात. त्यामुळे अचानक जर मधमाश्यांनी हल्ला केला तर नेमकं काय करावे हे सुचत नाही. त्यामुळे खाली दिलेले उपाय लक्षात ठेवा..

ट्रेंडिंग न्यूज

धोका जाणवताच लांब पळा

मधमाशा कधीही हल्ला करु शकतात. जेव्हा तुमच्या डोक्यावर एखादी मधमाशी घोंगावताना दिसेल तेव्हा तुम्ही सावध रहा. एकही माशी डोक्यावर फिरताना दिसली तर तेथून पळ काढा. जेव्हा एखादी मधमाशी तुमच्यावर हल्ला करते त्यानंतर काहीच वेळात मधमाशांच्या मोठा थवा तेथे येण्याची शक्यता असते. जेव्हा मधमाश्या एकत्र येतात तेव्हा त्या लाखोंच्या संख्येनी येतात. त्यामुळे एखादी माशी जरी पाहिलीत तर तातडीने सुरक्षीत स्थळी पोहोचा.
वाचा: बदाम घालून दूध सकाळी प्यावे की रात्री? काय आहेत शरीराला फायदे

पाण्यात कधीही उडी मारु नका

मधमाशांपासून रक्षण करण्यासाठी अनेकजण पाण्यात उडी मारतात. पण तज्ञांच्या मते, मधमाशांचा हल्ला झाल्यावर वाचण्यासाठी कधीही पाण्याच उडी मारु नका. पाण्यात उडी मारल्यावर तेथे बुडण्याचा धोका असतो. त्यामुळे अचानक दिसलेल्या पाण्यात उडी मारणे तुमच्यासाठी धोक्याचे असते.
वाचा: विचार करून मेंदू थकला असेल तर अशा प्रकारे करा त्याला रिलॅक्स, माइंड होईल क्लिअर

तातडीने रुग्णालयात जा

तुम्हाला मधमाशांनी डंख मारल्यानंतर प्रचंड वेदना होता. त्या मधमाशीच्या शरीराच्या पाठचा कुसळासारखा काटा तिने तुमच्या त्वचेत घुसविलेला असतो. तो लगेच तुमच्या शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा, कारण तो विषारी असू शकतो. जर तुम्हाला अनेक डंख मारले असतील तर ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार करा अन्यथा ते धोकादायक ठरू शकते.
वाचा: शिकंजी बनवण्याची ही पद्धत नवीन आहे, माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केली रेसिपी

चेहऱ्याचे सर्वात आधी रक्षण करा

जेव्हा मधमाश्या तुमच्यावर हल्ला करतात तेव्हा तातडीने तुमचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा. मधमाशा सामान्यतः तुमचे तोंड, नाक आणि डोळे यांसारख्या शरीरावरील नाजूक अवयवांना हल्ला करतात. त्यामुळे तो भाग सुजतो आणि काळा देखील पडतो.
वाचा: या कारणांमुळे होतो मूत्राशय कर्करोग, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

WhatsApp channel