मराठी बातम्या  /  Lifestyle  /  What To Do If Someone Ignores You Know Tips

Personality Development: जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर काय करावे?

 परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी काही टिप्स
परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी काही टिप्स (Freepik)
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
May 16, 2023 01:00 PM IST

Mental Health Care: कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीने दुर्लक्ष केले तर खूप वाईट वाटते. त्यामुळे अनेकांना तणावही येतो. या गोष्टीला सामोरे जाण्याचे काही मार्ग जाणून घ्या.

अनेकवेळा असे घडते जेव्हा काही व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आपल्याला त्रास होतो. अनेकजण निराश होतात. होतो. इथे आपण अशा कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलत नाही ज्याच्याशी तुम्ही कधी कधी बोलतो. येथे आपण अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत जिच्याशी आपण रोज बोलतो. तुम्ही ज्याच्याशी तुमच्या गोष्टी शेअर करा. अशा व्यक्ती तुमचे नातेवाईक, मित्र आणि तुमचे सहकारी असू शकतात. अशा स्थितीत काय करावं हे अनेक वेळा समजत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

पण अशा परिस्थितीत शहाणपणाने वागण्याची गरज आहे. यामुळे तुमचे नाते नेहमीच यशस्वी होते. आपण या परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी काही टिप्स सांगत आहोत.

बोलणे

जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा त्या व्यक्तीशी बोला. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की अचानक असे काय झाले की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याद्वारे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळते. म्हणूनच प्रकरण बंद करण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशीही बोला.

शांत रहा

कधी कधी कोणी दुर्लक्ष करते तेव्हा ती परिस्थिती समजणे फार कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीला थोडी जागा देऊ शकता. काही दिवस शांत राहणे आणि काही अंतर ठेवल्यानेही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव जाणवेल. ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील.

स्वतःला व्यस्त ठेवा

जेव्हा कोणी आपल्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते. जेव्हा हे करणारी व्यक्ती खूप जवळ असते तेव्हा आणखी वाईट वाटते. यामुळे आपण तणावाखाली राहतो. खूप वाईट वाटते. पण त्याऐवजी तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये रस आहे त्या करा. तुम्ही पुस्तके वाचू शकता. तुम्ही तुमच्या छंदावर काम करू शकता.

WhatsApp channel