मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Morning Routine: सकाळी सगळ्यात आधी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Morning Routine: सकाळी सगळ्यात आधी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 08, 2023 10:06 AM IST

Healthy Morning: जर तुम्ही दिवसाची सुरुवात निरोगी पद्धतीने केली तर दिवसभर फायदा होतो.

Meditation or mindfulness
Meditation or mindfulness (Pexels)

Health Care: आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते त्यानुसार आपला पुढचा दिवस जातो. दीर्घकाळ तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, सकाळ रुटीन सर्वोत्तम असायला हवं. सकाळी उठल्याबरोबर काही सवयी फॉलो करणे उत्तम ठरते. सकाळी आरोग्यदायी सवयी अवलंबल्या पाहिजेत. कारण दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. सकाळी उठल्याबरोबर दिवसाची सुरुवात होते, त्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात निरोगी सवयींनी करावी. यासाठी सकाळचं रुटीन कसं असावं याबद्दल आणि सकाळी सर्वात आधी काय करावे आणि काय नाही? याबद्दल जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यानंतर काय करावे?

कोमट पाणी प्या

दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास खूप फायदा होतो. तुम्हाला हेल्दी आणि निरोगी राहायचे असेल तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी गरम पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पोट निरोगी राहते आणि शरीर डिटॉक्स होते. शरीरात जमा झालेले विषारी पदार्थही गरम पाण्याने सहज निघून जातात. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

मेडिटेशन करा

तुमच्या व्यस्त जीवनात शांतता मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात मेडिटेशन करा. यामुळे तणाव, चिंता दूर होईल आणि मन हलके होईल. सकाळी २० मिनिटे मेडिटेशन केल्याने तुम्ही दिवसभरातील तणाव दूर ठेवू शकता. मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

चांगलं वाचन करा

सकाळी उठल्यावर काहीतरी चांगलं वाचलं पाहिजे. तुम्ही तुमचं कोणतेही आवडतं पुस्तक वाचू शकता. पुस्तक वाचायचे नसल्यास तुम्ही पेपरही वाचू शकता. यामुळे तुम्हाला खूप सकारात्मक भावना मिळेल आणि सकाळी माहितीही मिळेल.

शरीर स्ट्रेच करा

सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर काही काळ आळस वाटतो. यासाठी झोपेतून उठल्यानंतर बॉडी स्ट्रेच करा. यामुळे आळस आणि थकवा पूर्णपणे निघून जाईल. यामुळे स्नायूंनाही आराम मिळेल. तुम्ही सकाळी योगासने किंवा व्यायाम देखील करू शकता.

सकाळचा सूर्यप्रकाश घ्या

सकाळी उठून काही वेळ सूर्यप्रकाश अंगावर घ्या. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाशात बसल्याने मनात सकारात्मकता येते. उन्हात बसल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात. उन्हात बसल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. सकाळचा सूर्यप्रकाश त्वचेसाठीही फायदेशीर असतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel