मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thyroid Day 2023 : थायरॉईड असलेल्यांसाठी कोणती चाचणी करणे गरजेचे? जाणून घ्या

Thyroid Day 2023 : थायरॉईड असलेल्यांसाठी कोणती चाचणी करणे गरजेचे? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
May 25, 2023 05:02 PM IST

दरवर्षी २५ मे ला 'जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस' साजरा केला जातो. थायरॉईड रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस ओळखला जातो.

World Thyroid Day 2023
World Thyroid Day 2023 (Freepik )

थायरॉईड म्हणजे मानेमध्ये असलेली, फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी जी चयापचय नियंत्रित करणारी संप्रेरके (हार्मोन्स) निर्माण करते. तथापि, रोगप्रतिकारकशक्तीचा थायरॉईड ग्रंथीवर हल्ला झाल्यास त्याच्या कार्यात बाधा निर्माण होऊन आरोग्याच्या विविध समस्यां निर्माण होऊ शकतात. थायरॉईड अँटीबॉडी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती तयार करणाऱ्याऑटो-अँटीबॉडीअसतात ज्या थायरॉईड ग्रंथीला लक्ष्य करून त्यावर हल्ला करतात. अँटीबॉडीज आपल्या रोगप्रतिकारकशक्तीचा एक आवश्यक घटक आहेत, तरीही जेव्हा रोगप्रतिकारकतेचे प्रमाण वाढते आणि अनियंत्रित होते तेव्हा त्याचे आरोग्यावरनकारात्मक परीणाम होण्याची शक्यता असते. अधिक माहिती जाणून घेऊयात डॉ. राजेश बेंद्रे, चीफ ऑफ लॅब, न्यूबर्गडायग्नोस्टिक्स यांच्याकडून

मुख्य प्रकारचे थायरॉईड ऑटो-अँटीबॉडीज

थायरॉईड पेरोक्सिडेज अँटीबॉडी (टीपीओएबी), थायरोग्लोबुलिन अँटीबॉडी (टीजीएबी), आणि थायरॉईड-स्टीम्युलेटिंग हार्मोनरिसेप्टर अँटीबॉडी (टीआरएबी). टीपीओएबी आणि टीएबी थायरॉईड ग्रंथी मधील एन्झाइम आणि प्रथिनांना लक्ष्य करतात,तर टीआरएबी थायरॉईड ग्रंथीला अधिक संप्रेरक तयार करण्यासाठी उत्तेजित करते.

थायरॉईड अँटीबॉडी चाचणी

ऑटोइम्यून थायरॉईड रोगांचे निदान आणि निरीक्षण करण्यासाठी डॉक्टर थायरॉईड अँटीबॉडी चाचणीची शिफारस करतात. जेव्हा रोगप्रतिकारशक्ती थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते तेव्हा हे रोग होतात, ज्यामुळे हायपोथायरायडिझम किंवा हायपरथायरायडिझम होतो. थायरॉईड अँटीबॉडी चाचणी ही एक साधी रक्त चाचणी आहे जी रक्तातील टीपी ओएबी, टीएबी आणि टीआरएबीची पातळी मोजते. या चाचणी मुळे डॉक्टरांना थायरॉईड ग्रंथीच्या सुजेची तीव्रता आणि थायरॉईड विकार विकसित होण्याच्या प्रमाणाचा अंदाज करण्यात मदत होते.

टीपीओएबी चाचणी थायरॉईड पेरोक्सीडेसवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीच्या पातळीचे मोजमाप करते, जो थायरॉईड संप्रेरकांच्या उत्पादनासाठी आवश्यक एन्झाइम आहे. टीपीओएबी हे ऑटोइम्यूनथायरॉईड रोगविशेषतः ‘हाशिमोटोजथायरॉईडायटिस’ असलेल्या रुग्णांमध्येआढळणारी अँटीबॉडीआहे. ही चाचणी हाशिमोटोज थायरॉईडायटीसच्या प्रगतीचे निदान आणि निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. हाशिमोटोज थायरॉईडायटीसच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांना अनेकदा हायपरथायरायडिझमशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे जाणवतात आणि रोग वाढत जाऊन व्यक्तीला हायपोथायरायडिझम होतो.

थायरॉईड अँटीबॉडी चाचणी सुरक्षित आणि सोपीअसते, तरी देखील थायरॉईडसाठी किंवा थायरॉईड फंक्शनवर परिणामकरणारी इतर औषधे चालू असलेल्या रुग्णांनी थायरॉईड अँटीबॉडी चाचणी करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांना त्याविषयी माहिती दिली पाहिजे, कारण या औषधां चाचाचणीच्या परिणाम होऊशकतो. थोडक्यात, थायरॉईड अँटीबॉडी चाचणी स्वयंप्रतिकारथायरॉईड रोगांचे निदान आणि देखरेख करण्यासाठी एक उपयुक्तसाधन आहे. थायरॉईड अँटीबॉडीजची उच्चपातळी थायरॉईड रोग विकसित होण्याचा उच्च धोका दर्शवू शकते. थायरॉईड विकाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी योग्य चाचणी आणि उपचारांसाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

WhatsApp channel