Skin Care Tips: त्वचेचे अनेक प्रकार असतात. बाकी सगळ्या प्रकारात तेलकट त्वचा सगळ्यात जास्त त्रास देणारी असते. तुमचीही त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमचा चेहरा नेहमी स्वच्छ करत राहा. हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग करण्याचा नक्कीच विचार केला पाहिजे. तेलकट त्वचेची समस्या अशी असते की त्वचेची छिद्रात सतत तेल तयार करत राहतात. घाणीच्या संपर्कात आल्याने त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे पिंपलचा त्रास वाढतो आणि नंतर चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू शकतो. या सर्व कारणांमुळे तेलकट त्वचेवर काय लागू नये हे जाणून घेतले पाहिजे.
नारळ तेल तेलकट त्वचेसाठी चांगले नाही कारण खोबरेल तेलाचे कण खूप जाड असतात आणि त्वचेची छिद्रे ब्लॉक करतात. अशा परिस्थितीत, त्वचेच्या तेल ग्रंथी अधिक तेल तयार करतात, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते.
चेहऱ्यासाठी कठोर स्क्रब वापरल्याने त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेची छिद्रे अरुंद होतात ज्यामुळे त्वचा अधिक तेल तयार करू लागते. त्यामुळे तेलकट त्वचा अधिक तेलकट होते. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मऊ स्क्रब वापरा जेणेकरून त्वचेला इजा होणार नाही.
मॉइश्चरायझर लावा
तुम्ही तेलकट त्वचेवर कोणतेही जाड मॉइश्चरायझर आणि चिकट मॉइश्चरायझर वापरणे टाळावे. कारण जाड मॉइश्चरायझर्स तुमच्या त्वचेमध्ये राहतात आणि त्यामुळे तेल ग्रंथी जास्त तेल तयार करू लागतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा तेलकट असेल तर पेट्रोलियम जेली आणि मिनरल ऑइल लावणे टाळा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या