Right Age Gap Between Couple: तुमचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी कपलला एकमेकांच्या आवडी-निवडीची काळजी घ्यावी लागते. हल्ली अनेक कपल्स आपल्या वैवाहिक जीवनावर नाखूष असतात आणि एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. तसं तर घटस्फोट होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का पार्टनरचे वय हे सुद्धा घटस्फोटाचे कारण असू शकते. होय, जर तुम्ही असा जोडीदार निवडला असेल ज्याचे वय तुमच्यापेक्षा खूप लहान किंवा खूप मोठे असेल तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. अशा वेळी तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल की लग्नासाठी परफेक्ट कपलमध्ये वयाचे किती अंतर असावे? जाणून घ्या कपलमध्ये किती एज गॅप असावे.
रिपोर्ट्सनुसार जेव्हा पती-पत्नीमध्ये १ ते ३ वर्षांचे अंतर असते तेव्हा त्यांच्यातील समाधान सर्वाधिक असते. त्याच वेळी ४ ते ६ वर्षे वयोगटातील अंतर असलेल्या कपल्सच्या नात्यातील समाधानामध्ये थोडीशी घट होते.
हे कपल्समधील सर्वात सामान्य वयाचे अंतर आहे. अहवालानुसार या वयातील अंतर असलेल्या कपल्सना कमी भांडणे, गैरसमज आणि वादाला सामोरे जावे लागले आहे. हे वय इतर वयाच्या अंतरांच्या तुलनेत आदर्श मानले जाते. कारण ते कपल्सना स्थिरता प्राप्त करण्यास आणि एकमेकांना जवळून समजून घेण्यास मदत करते.
जर कपल्समध्ये खूप प्रेम आणि समज असेल तर वयात १० वर्षांचा फरक शक्य आहे. मात्र पती-पत्नीमध्ये प्रेम नसेल तर तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे अंतर असेल तर ध्येय, महत्त्वाकांक्षा आणि विचारांमध्ये फरक असू शकतो.
आनंदी वैवाहिक जीवनासाठी वयाचे अंतर योग्य असणे खूप महत्वाचे आहे. मात्र दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असले तरी परस्पर समंजसपणा असेल तर नाते अधिक चांगले होईल. कपल्सनी प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ दिली पाहिजे. जर तुमचा जोडीदार असा असेल तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या