मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ischemic Stroke: मिथुन चक्रवतींना आलेला इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं!

Ischemic Stroke: मिथुन चक्रवतींना आलेला इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 12, 2024 10:43 AM IST

Mithun Chakraborty Health update: सुपरस्टार अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती समोर नुकतीच आली. स्ट्रोक हे मृत्यूचे प्रमुख कारण असू शकते. ८७ टक्के स्ट्रोक इस्केमिक असतात. त्याची सुरुवातीची लक्षणे काय असतात जाणून घेऊयात.

brain stroke
brain stroke (freepik)

Ischemic Stroke Symptoms: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrabarty) यांची नुकतीच तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर कोलकाता रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर अली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक आल्याचे समजलं आहे. त्यांना इस्केमिक स्ट्रोक (Ischemic Stroke) आला होता. हा जीवघेणा आजार आहे. वाढत्या स्पर्धात्मक समाजात माणसाला शांततापूर्ण जीवन जगता येत नाहीये. अशा स्थितीत कामाची चिंता असते, भविष्यात काही गोष्टी साध्य करण्याची चिंता आजकाल अनेकांना आहे. याशिवाय स्वत:साठी वेळ न देणे, सकस आहाराचे पालन न करणे यामुळे अनेक धोके वाढत असतात. पण या सगळ्या गोष्टी मेंदूवर परिणाम करतात आणि मेंदूशी संबंधित रोग होतात. त्यापैकी एक प्रमुख आजार म्हणजे स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका. यापैकी सर्वात सामान्य स्ट्रोक म्हणजे इस्केमिक स्ट्रोक. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय?

यूएस सरकारच्या मेडलाइनप्लसच्या मते, स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे इस्केमिक आणि दुसरे म्हणजे हेमोरेजिक. इस्केमिक स्ट्रोक हा सर्वात सामान्य प्रकार आहे. हे सर्व स्ट्रोकपैकी सुमारे ८७% आहे. हे सहसा रक्ताच्या गुठळ्यामुळे होते जे मेंदूतील रक्तवाहिनीला ब्लॉक करते किंवा प्लग करते. यामुळे मेंदूला रक्त वाहून जाण्यापासून रोखते. काही मिनिटांतच मेंदूच्या पेशी मरायला लागतात. दुसरे कारण म्हणजे स्टेनोसिस किंवा धमनी अरुंद होणे.

ही आहे लक्षणं

> चेहरा, हात किंवा पाय (विशेषत: शरीराच्या एका बाजूला) अचानक सुन्न होणे किंवा अशक्तपणा येणे.

> अचानक गोंधळ वाटणे, बोलण्यात अडचण येणे.

> एका किंवा दोन्ही डोळ्यांत अचानक त्रास होणे.

> चालताना अचानक त्रास होणे, चक्कर येणे, संतुलन बिघडणे किंवा समन्वय कमी होणे.

> कोणत्याही अज्ञात कारणाशिवाय अचानक, तीव्र डोकेदुखी होणे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel