मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Viral: अंडर गारमेंट्सला एक्सपायरी डेट असते का?; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Viral: अंडर गारमेंट्सला एक्सपायरी डेट असते का?; तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 21, 2022 12:16 PM IST

तुम्ही अनेकदा विविध वस्तूंच्या एक्सपायरी डेटबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल, परंतु अंडर गारमेंट्सलाही एक्सपायरी डेट असते, याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का, वाचा काय आहे त्यामागचं सत्य...

Expiry of Undergarments
Expiry of Undergarments

Expiry Date Of Men's Underwear : आपल्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींची किंवा वस्तूंची एक विशिष्ट एक्सपायरी डेट असते. जर वस्तूची एक्सपायरी डेस संपली असेल तर त्याला कुणीही खरेदी करत नाही. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही वापरत असलेल्या अंडर गारमेंट्सलाही एक्सपायरी डेट असेल, त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, चला तर जाणून घेऊयात त्यामागचं सत्य. 

अंडर गारमेंट्सच्या बाबतीत एक्सपायरी डेटबद्दल आतापर्यंत कोणताही वैद्यकीय पुरावा सापडलेला नाही. परंतु जून्या अंडर गारमेंट्सचा वापर करणं मात्र आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हितावह नसतं. त्यासाठी काय करायला हवं किंवा तज्ज्ञांची याबाबत काय मतं आहेत पाहूयात.

अंडर गारमेंट्स सैर झाल्यास तात्काळ बदलायला हवं...

कोणत्याही अंडर गारमेंट्सची विशिष्ट एक्सपायरी डेट नसते, परंतु ती सैल झाल्यास त्याला तात्काळ बदलायला हवं, असं एनवाययू स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर फिलिप टिएर्नो यांनी याबाबत एका बेबसाईटशी बोलताना सांगितलं आहे.

दरवर्षी नव्या अंडर गारमेंट्स वापरा...

शरीरातील, मांड्यातील किंवा प्रायव्हेट पार्टमध्ये विविध रोगांचं संक्रमण टाळण्यासाठी अंडरवियरचा स्वच्छ असणं फार गरजेचं असतं. त्यासाठी एक नवी अंडरवियर किमान सहा महिने वापरायला हवी. त्यानंतर दुसऱ्या नव्या अंडरवियरचा वापर करायला हवा, याशिवाय चांगल्या दर्जाच्या आणि चांगल्या कंपनीच्या अंडरवियरचा वापर करायला हवा.

अॅलर्जी आणि संसर्ग होण्याचा धोका...

आतापर्यंत अंडरवियरच्या वापरामुळं काही गंभीर आजार झाल्याचं कधीही आढळलेलं नाही. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून सतत स्वच्छ आणि नव्या अंडरवियरचा वापर करायला हवा. नाही तर व्यक्तीला संसर्गजन्य रोगांचं संक्रमण, अॅलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, असं देखील काही तज्ज्ञांनी याबाबत सांगितलं आहे.

त्वचेवर रॅशेस पडण्याचा असतो धोका...

जून्या अंडरवियरचा वापर केल्यामुळं ते सैल होऊन त्यात ओलावा निर्माण व्हायला लागतो. त्यानंतर त्यात बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो, याशिवाय खराब अंडरवियर घातल्यानं शरीरावर पुरळ येण्याचीदेखील शक्यता असते, त्यासाठी उपाय म्हणून सातत्यानं स्वच्छ असलेल्या अंडरवियर घालायला हव्या. त्याचबरोबर एका विशिष्ट कालावधीनंतर नवीन अंडरवियर वापरायला हव्यात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या