मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Prostate Cancer : किंग चार्ल्स देतायत प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज; काय आहे हा आजार? वाचा!

Prostate Cancer : किंग चार्ल्स देतायत प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज; काय आहे हा आजार? वाचा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 06, 2024 11:57 AM IST

King Charles III: प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय आहे? याचे लक्षणं जाणून घ्या.

King Charles' battle with prostate cancer
King Charles' battle with prostate cancer ( (AP/PTI, Darryl Dyck/The Canadian Press via AP))

Prostate Cancer Symptoms: थकवा आणि अशक्तपणा ही सामान्य गोष्ट आहे. ही समस्या जास्त कामाच्या ताणामुळे किंवा काही प्रकारच्या आजारांमुळे होऊ शकते. ही समस्या अशीच बरी होते. परंतु जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्हाला त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कारण हे प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणं आहेत. आरोग्य तज्ज्ञांनुसार प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना थकवा आणि अशक्तपणाचा धोका असतो. कर्करोग हा पुरुषांमधील कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. प्रोस्टेट कर्करोग प्रोस्टेटमध्ये होतो, एक लहान अक्रोडाच्या आकाराची ग्रंथी जी वीर्य निर्माण करते. हा एक गंभीर आजार म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. अमेरिकेतील पुरुषांमध्ये कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार किंग चार्ल्स तीन यांनाही प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे.

मूत्र किंवा वीर्यमधून रक्तस्त्राव

पुरुषांमध्ये, मूत्र किंवा वीर्य मध्ये रक्त हे प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षण असू शकते. असे होत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रोस्टेट कर्करोगाच्या बाबतीत, ट्यूमर मोठा होतो. प्रजनन प्रणाली आणि मूत्रमार्गावर दबाव टाकू लागतो. ट्यूमरच्या या दबावामुळे, प्रजनन प्रणालीवर परिणाम होऊ शकते. त्यामुळे लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त दिसू लागते.

थकवा आणि अशक्तपणाची समस्या

प्रोस्टेट कर्करोग असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणेही असू शकतात तर काही पुरुषांमध्ये त्याची लक्षणे अजिबात दिसत नाहीत. लघवी आणि मूत्राशयाच्या समस्यांशी संबंधित असू शकतात. प्रोस्टेट कॅन्सरच्या इतर लक्षणांसोबतच, तुम्हाला अनेकदा अशक्तपणा आणि थकवा या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

वजन कमी होणे

तुमचे वजनही कोणत्याही उघड कारणाशिवाय कमी होत असेल तर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वजन कमी होणे हे प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षण असू शकते. प्रोस्टेट कर्करोगाच्या गंभीर अवस्थेत, तुमच्या शरीरात ऊर्जा वापरण्याच्या पद्धतीत बदल होतो, ज्यामुळे वजन कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुमचे वजनही कोणत्याही प्रयत्नाशिवाय कमी होत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel