मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Japanese Water Therapy: वजन कमी करण्यासाठी वापरा जपानी वॉटर थेरपी, जाणून घ्या प्रोसेसबद्दल!

Japanese Water Therapy: वजन कमी करण्यासाठी वापरा जपानी वॉटर थेरपी, जाणून घ्या प्रोसेसबद्दल!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 11, 2024 11:08 AM IST

Weight Loss Tips: जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम करायचा नसेल तर जपानी वॉटर थेरपीचा अवलंब करा. यामुळे फास्ट वजन कमी होते.

water therapy for weight loss
water therapy for weight loss (Freepik)

Japanese Water Burn Fat: वाढलेलं वजन ही फार मोठी समस्या आहे. शहरी लाइफस्टाइल अशी आहे ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. बाहेरचे फूड, स्टेबल नसलेली जीवनशैली आणि कमी शारीरिक हालचालींमुळे वजन झपाट्याने वाढू लागते. या समस्येवर अनेक प्रकारचे उपाय केले जातात. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम, योगा, झुंबा आणि डाएटिंगचा अवलंब करतात. पण हे नीट फॉलो केलं नाही तर अनेकदा आरोग्याची हानी होते. यासाठी तुम्ही योग्य मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला वजन कमी करण्‍याच्‍या एका वेगळ्या पध्‍दतीबद्दल सांगणार आहोत. आम्ही जपानी वॉटर थेरपीबद्दल बोलत आहोत. ही थेरेपी वजन कमी करण्यासाठी मदत करते. ही थेरपी पाण्याच्या सेवनावर आधारित आहे. यामुळे शरीरात साचलेली घाण साफ होते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. चला जाणून घ्या जपानी वॉटर थेरपी म्हणजे काय आणि ती कशी करायची.

जपानी वॉटर थेरपी म्हणजे काय?

ही थेरपी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर किमान ३-४ ग्लास कोमट पाणी प्यावे लागते. दात न घासता पाणी प्यावे जेणेकरुन शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर निघून जातील. यामुळे कॅलरीजचे प्रमाणही कमी होते. पाणी प्यायल्यानंतर सुमारे ४५ मिनिटे तुम्हाला काहीही खायचे नसते. ही सोपी थेरेपी तुम्हाला वजन कमी करायला मदत करेल. चला जाणून घेऊयात ही जपानी वॉटर थेरपी करायची.

कशी करायची थेरपी?

> सकाळी उठल्यानंतर दात न घासता ३-४ ग्लास पाणी प्या.

> लक्षात घ्या तुम्हाला रिकाम्या पोटी फक्त कोमट पाणी प्यावे लागेल. थंड पाणी अजिबात पिऊ नकात.

> पाणी घेतल्यानंतर सुमारे ४५ मिनिटे काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

> दिवसभरातील तुमच्या २ जेवणामधील अंतर किमान २ तास असावे.

> जेवण करण्यापूर्वी पाणी प्या, पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे साहजिक वजन कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel