मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Cancer Day: कर्करोगामधून बरे होण्‍याच्‍या प्रवासात कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या ? जाणून घ्या

World Cancer Day: कर्करोगामधून बरे होण्‍याच्‍या प्रवासात कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या ? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 03, 2024 08:50 AM IST

Health Care: उपचाराच्‍या या प्रवासामधून पॉझिटिव्ह राहण्यासाठी कोणत्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊयात.

What is important in the journey to recovery from cancer
What is important in the journey to recovery from cancer (freepik)

World Cancer Day 2024: स्‍तनाचा कर्करोग (Breast cancer) झाल्‍याचे समजल्‍यानंतर अत्‍यंत त्रासदायक व वाईट वाटण्‍यासह तुम्‍ही भावूक होऊ शकता. जगभरात स्‍तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्‍य प्रकार आहे, जेथे जागतिक स्‍तरावर २ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींना स्‍तनाचा कर्करोग असल्‍याचे आढळून आले आहे. नुकतेच करण्‍यात आलेल्‍या आयसीएमआर संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील स्‍तनाच्‍या कर्करोगाने(women health) पीडित रूग्‍णांचा जगण्‍याचा दर ६६.४ टक्‍के आहे. ही स्थिती आव्‍हानात्‍मक असली तरी कर्करोगाने पीडित फक्‍त तुम्‍हीच नाही हे समजून घेणे आवश्‍यक आहे. स्‍तनाच्‍या कर्करोगावरील उपचारांमधील प्रगती आणि उपलब्‍ध विविध सपोर्ट सिस्‍टम्‍स पाहता कर्करोगामधून बरे होण्‍याच्‍या प्रवासात आवश्‍यक स्थिरता व पाठिंब्‍याची खात्री मिळते.

दिल्लीमधील इंद्रप्रस्‍थ अपोलो हॉस्पि‍टल येथील मेडिकल ऑन्‍कोलॉजीमधील सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. मनिष के. सिंघाल म्‍हणाले, ''माझ्या अनुभवानुसार गंभीर आजार असल्‍याचे समजल्‍यानंतर ८० टक्‍क्‍यांहून अधिक रूग्‍ण घाबरून जातात, त्‍यांना जीवनाचा शेवट होण्‍याची भिती वाटते. व्‍यक्‍ती व त्‍यांच्‍या प्रियजनांमधील हे भितीचे वातावरण पाहता मी सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा सल्‍ला देतो. यामध्‍ये निदान झालेला आजार समजून घेणे, वैयक्तिकृत केअर योजना तयार करणे, उपचार पर्यायांबाबत सखोलपणे चर्चा करणे आणि मानसिक आरोग्‍यासाठी स्थिर पाठिंबा देणे यांचा समावेश आहे. रूग्‍णांना योग्‍य माहितीसह सक्षम करण्‍याबरोबरच ते त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत योग्‍य निर्णय घेऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत सर्वोत्तम जीवन जगण्‍याची शाश्‍वती देणारी प्रगत उपचार थेरपी उपलब्‍ध असल्‍याचे दाखवून देणे महत्त्वाचे आहे. आरोग्‍यसेवा व्‍यावसायिक (डॉक्‍टर्स) व रूग्‍ण यांच्‍यामधील सहयोगात्‍मक प्रयत्‍नाच्‍या माध्‍यमातून या स्थितीच्‍या वैद्यकीय पैलूंचे निराकरण करता येऊ शकते, तसेच जीवनाचा एकूण दर्जा देखील वाढवता येऊ शकतो, ज्‍यामुळे आरोग्‍यविषयक आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये स्थिरता व अर्थपूर्ण माहितीची खात्री मिळेल.''

उपचाराच्‍या या प्रवासामधून नेव्हिगेट करण्‍यासाठी अवलंबता येऊ शकतील अशा काही पायऱ्या पुढीलप्रमाणे:

१. स्‍वत:साठी योग्‍य उपचाराची निवड करा

 स्‍तनाचा कर्करोगावर उपचार करत असताना प्रत्‍येक उपचाराचे प्रतिकूल परिणाम देखील असतात हे माहित असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, केमोथेरपी उपचारामुळे केसगळती होणे भावनिकदृष्‍ट्या आव्‍हानात्मक असू शकते. आता अनेक प्रगत उपचार आहेत, जे तुम्‍हाला दीर्घकाळापर्यंत सर्वोत्तम जीवन जगण्‍यास मदत करू शकतील. उपचार पर्यायांसंदर्भात डॉक्‍टरांसोबत खुल्‍यामनाने चर्चा करण्‍याबरोबरच उपलब्‍ध थेरपींबाबत, तसेच मानसिक व शारीरिक आरोग्‍यावर होऊ शकणाऱ्या त्‍यांच्‍या संभाव्‍य प्रतिकूल परिणामांबाबत उत्तमप्रकारे माहिती मिळते. या चर्चेमधून उपचारादरम्‍यान कोणत्‍याही गोष्‍टीचा सामना करावा लागू शकतो याबाबत देखील बहुमूल्‍य माहिती मिळते.

२. आजाराचे निदान समजून घ्‍या

 सुरूवातीची व सर्वात महत्त्वाची पायरी म्‍हणजे डॉक्‍टरांची टीम तयार करा, ज्‍यामध्‍ये वैद्यकीय व सर्जिकल ऑन्‍कोलॉजिस्‍ट्सचा समावेश असेल. वैद्यकीय टीमशी खुल्‍यामनाने संलग्‍न होणे, त्‍यांना निर्धास्‍तपणे शंका विचारणे आवश्‍यक आहै. कर्करोगाचा प्रकार व टप्‍पा अशा विशिष्‍ट बाबींबाबत माहिती मिळवा, उपलब्‍ध उपचार पर्यायांचा शोध घ्‍या, संभाव्‍य प्रतिकूल परिणाम जाणून घ्‍या आणि आजाराचे निदान समजून घ्‍या. निदानाबाबत सक्रियपणे माहिती मिळवत तुम्‍ही स्‍वत:च्‍या आरोग्‍याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍यास सक्षम व्‍हाल.

३. सपोर्ट सिस्‍टममध्‍ये सामील व्‍हा/तयार करा

 स्‍तनाचा कर्करोगावर उपचार घेण्‍याच्‍या संपूर्ण प्रवासादरम्‍यान इतरांकडून प्रबळ पाठिंबा मिळेल असे वातावरण तयार करा. निदानाबाबत तुमचे जवळचे नातेवाईक व मित्रांना सांगा, कारण त्‍यांचा पाठिंबा व प्रोत्‍साहन या प्रवासामध्‍ये आवश्‍यक असलेला भावनिक आधार देईल. तसेच, स्‍थानिक सपोर्ट समुदाय किंवा ऑनलाइन समुदायाचे भाग बना, जेथे तुम्‍ही अशाच अनुभवांमधून जात असलेल्‍या व्‍यक्‍तींशी कनेक्‍ट होऊ शकता. इतरांसोबत तुम्‍हाला वाटणारी भिती, संघर्ष व माहिती शेअर केल्‍याने बहुमूल्‍य माहिती समजण्‍यास आणि मानसिक ताण काही प्रमाणात कमी होण्‍यास मदत होऊ शकते.

४. स्‍वत:च्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍या

 आरोग्‍याशी पूरक व्‍यायाम करत स्‍वत:ची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या. संतुलित आहार, नियमित व्‍यायाम व पुरेशी झोप यांसह आरोग्‍यदायी जीवनशैली राखणे कर्करोगावरील उपचारासाठी महत्त्वाचे आहे. तणावाचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी चिंतन किंवा योगा करा. आराम व आनंद देणाऱ्या सेल्‍फ-केअर क्रियाकलापांचे महत्त्व समजल्‍याने एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होते.

५. आर्थिक नियोजन

 कर्करोगाच्‍या उपचारादरम्‍यान संभाव्‍य आर्थिक आव्‍हानांचे निराकरण करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. उपचारासाठी होणारा खर्च समजण्‍यासाठी आणि उपलब्‍ध आर्थिक सहाय्यता उपक्रमांचा शोध घेण्‍यासाठी हेल्‍थकेअर टीम व विमा प्रदात्‍यांसोबत सल्‍लामसलत करा. घेतलेल्‍या अपॉइण्‍टमेंट्स कराव्‍या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च, चाइल्‍डकेअर आणि कामासंदर्भात करावे लागणारे आवश्‍यक समायोजन अशा व्‍यावहारिक पैलूंचा विचार करा.

६. माहितीचे कुशलतेने व्‍यवस्‍थापन करा

 आरोग्‍य व उपचार पर्यायांबाबत माहिती असणे आवश्‍यक असले तरी अधिक प्रमाणात माहिती मिळाल्‍याने चिंता देखील वाढू शकते. अनावश्‍यक तणाव टाळण्‍यासाठी विश्‍वसनीय स्रोतांवर अवलंबून राहत आणि डॉक्‍टरांकडून योग्‍य मार्गदर्शन घेत संतुलन राखा.

स्‍तनाच्‍या कर्करोगासह निदान होणे हे निश्चितच आव्‍हानात्‍मक व परिवर्तनकारी आहे. वैद्यकीय व्‍यावसायिकांचे मार्गदर्शन, उपचार पद्धतींबाबत सर्वसमावेशक माहिती, प्रबळ सपोर्ट सिस्‍टम आणि उपचाराच्‍या व्‍यावहारिक पैलूंबाबत माहिती यांसह या आव्‍हानात्‍मक स्थितीमधून तरुन जाणे शक्‍य आहे. या आजाराने पीडित फक्‍त तुम्‍हीच नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, तसेच अनेक उपचार व समुदाय पाठिंबा व प्रोत्‍साहन देण्‍यास सज्‍ज आहेत. एकावेळी एक पाऊल उचलत उपचाराचा अवलंब करा, ज्‍यामुळे तुम्‍ही रिकव्‍हर होण्‍यासोबत भविष्‍यात आरोग्‍यदायी जीवन जगण्‍याची खात्री मिळू शकते.

WhatsApp channel