मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Humming Meditation Benefits: हमिंग मेडिटेशन म्हणजे काय? जाणून घ्या शरीरासाठी किती आहे फायदेशीर!

Humming Meditation Benefits: हमिंग मेडिटेशन म्हणजे काय? जाणून घ्या शरीरासाठी किती आहे फायदेशीर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 06, 2024 10:17 PM IST

What does humming do when meditating: हमिंग मेडिटेशन म्हणजे काय आणि त्याचे नक्की काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

Mental Health Care
Mental Health Care (freepik)

What are health benefits of humming meditation: तुम्ही लोकांना अनेकदा एकट्यातच गुणगुणताना पाहिलं असेल. अंघोळ करताना, चालताना, स्वयंपाक करताना, लोक गुणगुणत राहतात. तुम्हीही हे कधी ना कधी करत असालच. पण तुम्हाला हे माहितेय का की गुणगुणणे हे एक प्रकारचे मेडिटेशन आहे. अशा प्रकारे गुणगुण्याला 'गुनगुन ध्यान' अर्थात हमिंग मेडिटेशन म्हणतात. अनेकांना याबद्दल हे माहित नसेल की याचे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही गुणगुणता तेव्हा तुम्हाला आनंदी, ताजेतवाने आणि हलके वाटते. याचे अजून अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊया हमिंग मेडिटेशन म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे आहेत.

हमिंग मेडिटेशन म्हणजे काय?

आधी जाणून घेऊयात की हमिंग मेडिटेशन म्हणजे काय. जेव्हा तुम्ही काहीतरी करताना गुणगुणता तेव्हा त्याला हमिंग मेडिटेशन म्हणतात. या मेडिटेशनमध्ये तुमचे शरीर कंपन करू लागते. कंपन प्रामुख्याने तुमच्या मेंदूच्या पेशींमध्ये होते. यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्हाला बरे वाटते. हमिंग मेडिटेशनमुळे थकवाही दूर होतो.

हमिंग मेडिटेशन कसे करावे?

> शांत ठिकाणी बसून पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा.

> डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या, शरीराला आराम द्या.

> ओठ बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि नंतर गुनगुन करताना नाकातून हळूहळू श्वास सोडा.

> श्वास सोडताना पूर्ण वेळ गुणगुणावे करत राहावे.

> पूर्णपणे श्वास सोडल्यानंतर, दीर्घ श्वास घ्या आणि नंतर गुनगुन करताना श्वास सोडा.

> हे एका वेळी १ मिनिटासाठी करावे लागेल आणि नंतर १५-२० वेळा पुन्हा पुन्हा करा.

हमिंग मेडिटेशनचे फायदे

> गुणगुणत राहिल्यास तणाव कमी होतो आणि शरीराला खूप आराम वाटतो.

> हमिंग मेडिटेशन केल्याने शरीरात कंपन निर्माण होते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीर तंदुरुस्त राहते.

> जे लोक गुणगुणत राहतात त्यांना अनेकदा चांगली झोप येते आणि त्यांना अस्वस्थता कमी होते.

> हमिंग मेडिटेशनमुळे शरीरात आनंदी हार्मोन्स वाढतात ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

> हे मन एकाग्र होण्यास मदत करतात.

> हमिंग मेडिटेशन केल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती सुधारते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel