मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dopamine Dressing: डोपामाइन फॅशनचा वाढलाय ट्रेंड, जाणून घ्या कसा करायचा फॉलो!

Dopamine Dressing: डोपामाइन फॅशनचा वाढलाय ट्रेंड, जाणून घ्या कसा करायचा फॉलो!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 29, 2024 12:22 PM IST

Trending Fashion: डोपामाइनची फॅशन खूप ट्रेंडमध्ये अली आहे. हा ट्रेंड नक्की काय आहे हे जाणून घ्या.

what is Dopamine Dressing
what is Dopamine Dressing (Instagram)

Dopamine Fashion: जगात अनेक प्रकारची फॅशन केली जाते. सतत नवनवीन ट्रेंड येत जात असतात. अनेकदा हे ट्रेंड ग्लोबल ते लोकल सगळिकेच फॉलो केले जातात. कोणताही ड्रेस ट्रेंडमध्ये असेल, बहुतेक लोक त्याच प्रकारचे कपडे घालणे किंवा तोच ट्रेंड फॉलो करणे पसंत करतात. असाच एक आजकाल डोपामाइनची फॅशन ट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत बहुतेकांनी डोपामाइनबद्दल ऐकले असेल. हा शब्द आपल्या आनंद आणि समाधान दर्शवतो. हा मूड आणि भावना सुधारण्यास मदत करतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

डोपामाइन फॅशन म्हणजे काय?

डोपामाइन फॅशनमध्ये तुम्ही कोणतेही आणि कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केले तरी ते तुमच्या मूडवर परिणाम करतात. हा ट्रेंड फक्त चांगले दिसण्याबद्दल नाही तर फील गुडबद्दलही आहे. जे कपडे तुम्हाला छान दिसतात त्याने तुम्हाला आनंदही मिळतो.

Winter Fashion: साडीत जाणवणार नाही थंडी, फक्त या टिप्स करा फॉलो!

डोपामाइन फॅशन कशी करायची?

फुलणारे रंग

तुमच्या वॉर्डरोबमध्ये चमकदार रंगाचे कपडे ऍड करा. असे रंग निवडा जे घातल्यानंतर तुम्हाला चांगले आणि उत्साही वाटेल. लाल, केशरी आणि गुलाबी अशा फुललेल्या रंगांचे कपडे घाला.

Colour of The Year 2024: २०२४ चा आहे हा रंग, जाणून घ्या कोण निवडतं कलर ऑफ द इयर!

बोल्ड ॲक्सेसरीज मिक्स आणि मॅच

जर तुम्हाला वरती सांगितलेले रंग घालणे फारसे आवडत नसेल. अशावेळी तुम्ही बोल्ड ॲक्सेसरीज घालू शकता. छान लुक देणारी हँडबॅग कॅरी करा. जे तुमच्या आउटफिटला शोभेल. यासोबतच स्टायलिश कानातले घाला, जे तुमचा लुक पूर्ण करतील.

Silk Saree Wash: घरी सिल्कच्या साड्या कशा धुवायच्या? जाणून घ्या सोपी ट्रिक!

प्रिंट्स आणि पॅटर्न

तुमचे कपडे निवडताना आकर्षक प्रिंट्स आणि पॅटर्न निवडा. अवलंब करा. असे कपडे तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. अशा ट्रेंडी प्रिंट्स आणि पॅटर्न आजकाल अनेक प्रकारचे कपडे आणि डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत.

आत्मविश्वास महत्वाचा आहे

लक्षात ठेवा की डोपामाइन ड्रेसिंग किंवा डोपामाइन फॅशन म्हणजे तुम्ही जे काही घालता त्यात चांगले आणि कॉन्फिडन्ट वाटते. जे कपडे घालण्यास तुम्हाला आरामदायक वाटत असेल तेच कपडे निवडा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel