Dandelion Tea: काय आहे डँडेलियन टी? लिव्हरसाठी मानले जाते प्रभावी औषध, पाहा आरोग्य फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dandelion Tea: काय आहे डँडेलियन टी? लिव्हरसाठी मानले जाते प्रभावी औषध, पाहा आरोग्य फायदे

Dandelion Tea: काय आहे डँडेलियन टी? लिव्हरसाठी मानले जाते प्रभावी औषध, पाहा आरोग्य फायदे

Jun 10, 2024 03:43 PM IST

What is Dandelion Tea: डँडेलियन टी हे एक जुने हर्बल ड्रिंक आहे जे यकृत बरे करण्यासाठी वापरले जाते. याशिवाय इतर अनेक आरोग्य समस्यांमध्ये सुद्धा हा चहा आराम देतो.

डँडेलियन टीचे आरोग्य फायदे
डँडेलियन टीचे आरोग्य फायदे

Health Benefits of Dandelion Tea: जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर दुधाच्या चहाऐवजी हर्बल ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला जातो. केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये अनेक प्रकारचे हर्बल ड्रिंक्स आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यापैकी एक म्हणजे डँडेलियन टी. जी विशेषतः चीनपासून युरोपपर्यंतच्या देशांमध्ये प्यायली जाते. हा चहा प्यायल्याने शरीरातील डिटॉक्सिफिकेशन होते तसेच यकृत निरोगी राहण्यास मदत होते. जाणून घ्या काय आहे डँडेलियन टी आणि त्याचे फायदे.

डँडेलियन टी म्हणजे काय?

डँडेलियन हे एक प्रकारची वनस्पती आहे जी एक हजार वर्षांहून अधिक जुनी आहे. हे रानटी फुलझाड असून याला पिवळ्या रंगाची फुले येतात. या वनस्पतीचा चहा चीन, युरोप आणि इजिप्त सारख्या देशांमध्ये औषध म्हणून प्यायला जातो. डँडेलियन वनस्पतीच्या पानांपासून ते मुळांपर्यंत सर्व काही चहासाठी वापरले जाते. अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांमध्ये हे पिणे फायदेशीर आहे. इतकेच नाही तर डँडेलियन होमिओपॅथी औषध म्हणून देखील वापरले जाते.

डँडेलियन टी प्यायल्यास अनेक आरोग्य फायदे मिळतात

लिव्हरसाठी टॉनिक म्हणून काम करते डँडेलियन टी

डँडेलियन टी यकृतासाठी खूप प्रभावी औषध आहे. हा चहा प्यायल्याने यकृतातील पित्ताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करते आणि यकृताचे नुकसान देखील दुरुस्त करते. काही प्रमाणात डँडेलियन टी प्यायल्याने डॅमेज लिव्हर चांगले होण्यास मदत होते. २०१७ च्या अभ्यासानुसार या चहामध्ये आढळणारे पॉलिसेकेराइड यकृताचे कार्य वाढवते.

वजन कमी करण्यास करते मदत

यकृताव्यतिरिक्त डँडेलियन टी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

पचनास मदत करते

डँडेलियन टी प्यायल्यास भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बद्धकोष्ठता बरी होते आणि पचन देखील सुधारते.

- २०११ च्या अभ्यासानुसार डँडेलियन वनस्पतीच्या मुळांचे अर्क कर्करोगाच्या पेशींना रोखण्यात मदत करतात.

- इतकेच नाही तर डँडेलियन टी स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या पेशींवरही प्रभाव दाखवतो.

 

कसा बनवायचा डँडेलियन टी

डँडेलियन टी बाजारात मिळेल. ते दोन कप पाण्यात उकळून गाळून प्यावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner