मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ram Laddu: बाजारात मिळणारे राम लाडू भगवान श्री रामाशी संबंधित आहेत का? जाणून घ्या

Ram Laddu: बाजारात मिळणारे राम लाडू भगवान श्री रामाशी संबंधित आहेत का? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 20, 2024 02:48 PM IST

Connection of Ram Laddu: दिल्लीपासून अयोध्येपर्यंत राम लाडू प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का याला राम लाडू का म्हणतात? या लाडूंचा प्रभू रामाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या.

story behind ram laddu
story behind ram laddu (Pinterest)

Ram Laddu Connection With Lord Ram: ऋषिकेश असो वा दिल्ली अनेक ठिकाणी तुम्हला स्वादिष्ट आणि गरमागरम रामजी लाडू खायला मिळतील. या पदार्थाचं नाव ऐकलं की असं वाटतं की हे लाडू असतील. पण अजिबात तसं नाही. हे राम लाडू खूप मसालेदार आणि थोडेसे आंबट असतात. होय ही डिश मूग आणि हरभरा डाळीपासून बनवलेली आहे. एवढेच नाही तर रामाच्या नगरीत अर्थात अयोध्येतही राम लाडू खूप प्रसिद्ध आहेत. आता तुमच्या मनात हाच प्रश्न येत असेल की या लाडूंना राम लाडू का नाव पडले असेल? राम लाडू आणि प्रभू राम यांचा काही संबंध आहे का? प्रभू रामजींनी हे लाडू कधी खाल्लेत का? प्रभू रामांना हे लाडू आवडायचे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

राम लाडू हे नाव कसे पडले?

खरं तर, दिल्लीच्या प्रसिद्ध मार्केट लाजपत नगरमध्ये एक राम लाडूचे दुकान आहे. तिकडची ही डिश इतकी फेमस आहे की तिकडे तुम्हाला राम लाडू खाणाऱ्या लोकांची लांबलचक रांग पाहायला मिळेल. या दुकानावर मोठ्या अक्षरात राम लाडू असेही लिहिलेले आहेत. हे खूप जुने दुकान आहे. पूर्वी येथे एक छोटासा स्टॉल असायचा. पण आता त्याचे मोठे दुकान झाले आहे. सकाळी १०-११ वाजल्यापासून राम लाडू विकण्यास सुरुवात होते आणि रात्री ९ वाजेपर्यंत या दुकानात गर्दी असते.

Ram Laddoo Recipe: नाश्त्यासाठी बनवा दिल्लीचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड 'राम लाडू', जाणून घ्या रेसिपी!

लाजपत नगरमध्ये राम लाडू विकणारा एक विक्रेता सांगतो की, येथे १९८३ पासून राम लाडूचे दुकान सुरू आहे. राम बाबू असे या दुकानाच्या मालकाचे नाव आहे. त्याच्याच नावावरून राम लाडू हे नाव त्या काळी ठेवण्यात आले होते. म्हणजे या लाडूंचा प्रभू रामाशी काही संबंध नाही. त्याचे नाव फक्त राम लाडू आहे आणि तेही दुकान मालकामुळे.

अयोध्येत प्रसिद्ध आहे राम लाडू

या पदार्थाच्या नावावरूनच रामललाच्या नगर अयोध्येतही राम लाडूंची विक्री सुरू झाली. तिकडच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडमध्ये राम लाडूचे नाव समाविष्ट आहे. तुम्ही कधी अयोध्येला गेलात किंवा सध्या अयोध्येत असाल तर राम लाडू खाण्यास विसरू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel