2 June ki Roti: भाग्यवान लोकांना मिळते 'दो जून की रोटी', सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या म्हणीचा अर्थ जाणून घ्या
आज २ जून आहे. 'दो जून की रोटी' या म्हणीवर लोक अनेकदा विनोद करतात. पण या म्हणीचा अर्थ काय हे अनेकांना माहित नाही.
सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होतंच असतं. कधी एखादा व्हिडीओ तर कधी एखादी ओळ. अशीच एक म्हण सोशल मीडियावर व्हायरल आहे. ती म्हणजे 'दो जून की रोटी'. या म्हणीवर लोक अनेकदा विनोद करतात. उदाहरणार्थ, आज २ जून आहे, तुम्ही आज चपाती खावी कारण '२ जूनची चपाती मिळणे फार कठीण आहे'. याशिवाय 'ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांना २ जूनला चपाती मिळते'. या म्हणीचा नक्की अर्थ काय जाणून घेऊयात.
ट्रेंडिंग न्यूज
२ जून म्हणजे काय?
'दो जून' म्हणजे दोन वेळा. अवधी भाषेत 'जून' म्हणजे 'वेळ'. 'दो जून की रोटी' म्हणजे तुम्हाला दोन वेळचे जेवण मिळत आहे. याचा अर्थ तुम्ही श्रीमंत आहात. जर एखाद्याला 'दो जून' म्हणजेच 'दोनवेळ'चे जेवण मिळत नसेल, तर त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, खूप मेहनत करूनही 'दो जून की रोटी' म्हणजेच 'दोनवेळचे' अन्न मिळत नाही. २ जूनचा साधा अर्थ म्हणजे दिवसातून दोन वेळचे अन्न मिळणे असा आहे. २ जून हा दिवस उत्तर भारतात, विशेषत: पूर्व उत्तर प्रदेशात खूप प्रसिद्ध आहे.
अनेकांना मिळत नाही अन्न
लक्षात ठेवा की आताही असे लोक भारतात राहतात, ज्यांना 'दो जून की रोटी' मिळत नाही. २०१७ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, भारतात १९ कोटी लोकांना 'दो जून की रोटी' मिळत नाही. लोकांना दोन वेळचं अन्न मिळू शकेल, म्हणून सरकारने कोरोनाच्या काळात लोकांना मोफत रेशनचे वाटप केले. सुमारे ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(Disclaimer : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' कोणत्याही प्रकारच्या ओळखीची, माहितीची पुष्टी करत नाही.)