Social Media Viral Video: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होतं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये लोक आपण विचार न करतानाचेही कामे करताना दिसत आहेत. पण आता सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. या व्हिडीओमध्ये एक अंतराळवीर अंतराळात उभा राहून ओला टॉवेल पिळताना दिसत आहे. जेव्हा तो ओला टॉवेल पिळून घेतो. मग त्यानंतर त्यात असलेल्या पाण्याचे काय होते? हे पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक अंतराळवीर स्पेसशिपमध्ये दिसत आहे. तो ओला टॉवेल पिळताना दिसत आहे. साधारणपणे जर आपण ओला टॉवेल पिळतो तेव्हा त्याचे पाणी जमिनीवर खाली येते. याचे कारण गुरुत्वाकर्षण आहे. पण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. याचमुळे ओला टॉवेल पिळला तर त्याचे पाणी जमिनीवर खाली पडत नाही. उलट ते टॉवेलच्या वर येते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अंतराळवीर जेव्हा ओला टॉवेल पिळतो तेव्हा पाणी खाली न पडता टॉवेलच्या वर आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ @gnoledgeofficial नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत १६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सने कमेंट केल्या आहेत. 'अंतराळवीरांबद्दलचा जास्तीत जास्त आदर आणि आम्हा सर्वांना शिकवण्याची त्यांची आवड.' दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'मी विचार केला तसे होईल.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'हे खूप चांगले आहे.'
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)