Caffeine side effects: आपल्या अनेक भारतीयांची दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. अशी सुरुवात करणे हे फारच सामान्य आहे. चहा-कॉफीचे शौकीन त्याशिवाय दिवसाची सुरुवात अपूर्ण मानतात. पण हे शरीरासाठी हानिकारक आहे हे तुम्हाला माहीतच असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का की फक्त एक महिना कॅफीन सोडल्याने शरीरात ५ मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात. पण या आधी हे असे केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेयला हवे. आम्ही तुम्हाला अशा ५ फायद्यांबद्दल सांगतो जे तुमच्या दिनचर्येतून चहा आणि कॉफी काढून टाकल्यानंतर तुम्हाला मिळतील.
जास्त कॉफी आणि चहा प्यायल्याने दातांवर वाईट परिणाम होतो. यामुळे दातांवर डाग पडतात. कॉफी, चहा आणि सोडा यांसारखी कॅफिनयुक्त पेये इस्ट्रोजेनची पातळी बदलू शकतात.
जर तुम्ही १ महिन्यासाठी चहा-कॉफी पिणे बंद केले तर तुम्हाला चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत. त्याच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके सामान्यपेक्षा अधिक वेगाने वाढतात. यामुळे चिंताग्रस्त अटॅकचा धोका वाढतो. ज्यांना आधीच मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी विशेषतः ते टाळावे.
कॅफिनचे सेवन न करणे तुमच्या रक्तदाबासाठी चांगले असू शकते. दररोज ३ ते ५ कप कॅफिनमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
कॅफिनच्या अतिसेवनामुळे तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. रात्रीचे सेवन करणे टाळावे. त्याच वेळी, नेहमी झोपण्याच्या ६ तास आधी चहा घ्या.
कॅफिनचे सेवन न करणे तुमच्या रक्तदाबासाठी चांगले असू शकते. दररोज ३ ते ५ कप कॅफिनमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या