मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Personality Test: तुमचा आवडता रंग तुमच्याविषयी अनेक गोष्टी सांगून जातो, जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

Personality Test: तुमचा आवडता रंग तुमच्याविषयी अनेक गोष्टी सांगून जातो, जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 04, 2024 01:24 PM IST

Personality Test: तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आवडत्या रंगावरून तुमच्याबद्दल अनेक गोष्टी ओळखता येतात. होय, आपला आवडता रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगतो.

What does your favourite colour tell about you and your personality: तुमचा आवडता रंग
What does your favourite colour tell about you and your personality: तुमचा आवडता रंग (Shutterstock)

व्यक्तीच्या आवडी-निवडीमध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक रहस्ये दडलेली असतात. हा कशा प्रकारचा माणूस आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व काय आहे, समाज आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याला कशा प्रकारचे जीवन जगायला आवडते? या सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या आवडी-निवडीवरून अनेकदा कळतात. त्याचप्रमाणे माणसाचा आवडता रंगही त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो. प्रत्येक व्यक्तीचा आवडता रंग वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीच्या आवडत्या रंगाच्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप अंदाज बांधता येतो. चला जाणून घेऊया तुमचा आवडता रंग तुमच्याबद्दल काय सांगतो.

पांढरा रंग आवडणारे लोक

ज्यांना पांढरा रंग सर्वात जास्त आवडतो, अशा लोकांचे चारित्र्य अतिशय शांतताप्रिय असते. त्यांच्यात सहिष्णुता खूप जास्त असते. कोणतेही वातावरण शांत करण्याची क्षमता त्यांच्यात असते. ज्या लोकांना पांढरा रंग सर्वात जास्त आवडतो ते खूप दयाळू असतात. अनोळखी व्यक्तींमध्ये भेदभाव न करता ते नेहमीच सर्वांच्या मदतीला उभे राहतात. अशा लोकांना खूप कमी बोलायला आवडतं आणि अतिशय विचारपूर्वक आपले शब्द निवडतात.
वाचा: स्वयंपाकघरातील वस्तू पावसाळ्यात कशा सांभाळाव्यात? 'या' टिप्स येतील तुमच्या कामी!

काळा रंग आवडणारे लोक

ज्यांचा आवडता रंग काळा असतो ते अतिशय लाजाळू स्वभावाचे असतात. त्यांच्यापैकी बहुतेकांना गर्दीत शांत राहणे आवडते, परंतु याचा अर्थ असा नाही की ते आपले म्हणणे कोणाच्याही समोर ठेवत नाहीत. जिथे गरज असेल तिथे ते मोकळेपणाने आपल्या गोष्टी सर्वांसमोर ठेवतात. ते त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी करत असतात. त्यांच्या जवळच्या व्यक्तींना देखील त्यांच्याविषयी माहिती नसते.
वाचा: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा

ट्रेंडिंग न्यूज

हिरवा रंग आवडणारे लोक

ज्या लोकांना आवडता रंग हिरवा असतो त्यांना स्वतंत्र आणि थरारक आयुष्य जगणे आवडते. जीवन जगण्याच्या पद्धतीत कोणत्याही प्रकारचे बंधन ते स्वीकारत नाहीत. ते अतिशय समजूतदार, आपल्या नातेसंबंधांशी आणि समाजाशी अत्यंत एकनिष्ठ असतात. पण त्यांना आयुष्यात स्वातंत्र्य आवडतं. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन मान्य नाही. त्यांना मोकळेपणाने आयुष्य जगायला आवडतं.

लाल रंग आवडणारे लोक

ज्यांचा आवडता रंग लाल असतो त्यांना मोकळेपणाने आयुष्य जगायला आवडते. त्यांना मैत्री करायला, नवनवीन साहस करायला आवडतं. असे लोक अनोळखी व्यक्तींशी सहज मैत्री ही करतात. ज्या लोकांना लाल रंग सर्वात जास्त आवडतो त्यांना पॅशन खूप आवडते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते पृथ्वी आणि आकाश एकत्र करतात.

पिवळा रंग आवडणारे लोक

ज्यांचा आवडता रंग पिवळा असतो, असे लोक खूप पॉझिटिव्ह असतात. ते खूप आशावादी असतात जे नेहमीच जीवनाच्या सकारात्मक पैलूकडे लक्ष देतात आणि नकारात्मकतेपासून दूर राहतात. कुठल्याही गोष्टीत चांगलं शोधण्याची त्यांना सवय असते. असे लोक आपल्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांना आकर्षित करतात.
वाचा: 'ही' आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, जाण्यापूर्वी नक्की विचार करा

निळा रंग आवडणारे लोक

निळा रंग सर्वात जास्त आवडतो ते अत्यंत निष्ठावान असतात. ते कुटुंब आणि मित्रांसाठी खूप समर्पित असतात. कठीण परिस्थितीतही ते आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. ज्यांचा आवडता रंग निळा आहे ते खूप भावूक असतात. त्यांना दिखावा करायला आवडत नाही. ते आतून जसे आहेत तसे बाहेरून दिसतात.

गुलाबी रंग आवडणारे लोक

ज्यांचा आवडता रंग गुलाबी आहे ते अतिशय साधे आणि नाजूक स्वभावाचे असतात. त्यांना आपल्या आयुष्यात समतोल राखायला आवडतो. ते आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. सहजतेने लोक त्यांच्या जवळ येतात आणि मैत्री करतात. गुलाबी रंग आवडणारे लोक स्वभावाने उत्साही असतात आणि आयुष्यात ध्येय घेऊन पुढे जातात.

WhatsApp channel