Vitamin b12 food: अनेकांच्या चेहऱ्यावर काळे चट्टे आणि टिपके असतात. यामुळे संपूर्ण लूक जातो. हे चट्टे काढण्यासाठी एकप्रकरच स्किनकेअर रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे असं वाटतं. जर तुम्हाला असं वाटतं असेल की हे डाग किंवा चट्टे स्किन केअर रूटीनचे पालन न केल्यामुळे असे झाले आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. अनेक वेळा त्वचेची योग्य काळजी घेतल्यानंतरही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा निस्तेज होतो. हे व्हिटॅमिन कोणते आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चट्टे येतात याबद्दल जाणून घेऊयात.
वाढत्या वयाबरोबर त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते आणि त्यातील काही जीवनसत्त्वाचे उत्पादन कमी होते. हे आपण आहारातच्या मदतीने पूर्ण करू शकतो. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास त्वचेचे सौंदर्य कमी होते. यामुळे पिंपल्स, फ्रिकल्स, कोरडी त्वचा आणि ओठ फुटतात. असे काही पदार्थ आहेत जे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढू शकतात.
> दुधापासून बनवलेली पदार्थ जसे की चीज, हे जीवनसत्वाचे चांगले स्रोत आहेत. इतर व्हिटॅमिन बी १२ पदार्थांपेक्षा दूध पोटात जलद आणि सहज शोषले जाऊ शकते.
> शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी १२ चा दही हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. एक कप साध्या दह्यात २८% व्हिटॅमिन बी१२ असते.
> कोंडा आणि होल व्हीट ओट्स सारखी फोर्टिफाइड तृणधान्ये व्हिटॅमिन बी १२ तसेच फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन ए देतात. फोर्टिफाइड तृणधान्यांचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी१२ ची पातळी वाढण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या