Health Care: ब्लड शुगर कमी झाल्यावर दिसतात ही लक्षणे, प्रतिबंधासाठी फॉलो करा या गोष्टी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Care: ब्लड शुगर कमी झाल्यावर दिसतात ही लक्षणे, प्रतिबंधासाठी फॉलो करा या गोष्टी

Health Care: ब्लड शुगर कमी झाल्यावर दिसतात ही लक्षणे, प्रतिबंधासाठी फॉलो करा या गोष्टी

Published Mar 28, 2023 03:26 PM IST

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करावे लागतात. शुगर लेव्हल कमी होण्याची लक्षणे काय आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

रक्तातील साखर कमी होण्याची लक्षणे आणि उपाय
रक्तातील साखर कमी होण्याची लक्षणे आणि उपाय (unsplash)

Symptoms of Low Blood Sugar: मधुमेह झाल्यास आहार आणि जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही कसे आणि कोणत्या वेळी खातात हेही महत्त्वाचे आहे. साखरेची पातळी वाढली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार, औषध किंवा इन्सुलिनचे उपचार करावे लागतात. जसे साखरेचे प्रमाण वाढणे जेवढे गंभीर असते तेवढेच ब्लड शुगर लेव्हल कमी झाल्याने सुद्धा अधिक त्रास होऊ शकतो. ब्लड शुगर लेव्हल कमी होण्याची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घ्या.

अचानक कमी का होते ब्लड शुगर

रक्तातील साखर वाढण्याची किंवा कमी होण्याची अनेक कारणे आहेत. रक्तातील साखर कमी असण्याची अनेक कारणे असू शकतात. रिपोर्ट्सनुसार, औषधे आणि इन्सुलिन इंजेक्शन्सचा जास्त वापर केल्याने रक्तातील साखर कमी होण्याची समस्या उद्भवते. याशिवाय जेव्हा मधुमेही रुग्ण जेवण सोडतात किंवा सामान्यपेक्षा कमी अन्न खातात, तेव्हा देखील रक्तातील साखर कमी होण्याची समस्या होऊ शकते.

ब्लड शुगर कमी होण्याचे प्रारंभिक लक्षणं

- घाम येणे

- थकवा

- चक्कर येणे

- भूक लागणे

- थरथरणे

- हृदयाचे ठोके जलद होणे

- चिडचिड

- तणाव किंवा मूडी होणे

- फिकेपणा

- अशक्तपणा

- लक्ष केंद्रित करण्यात अडचण

- चक्कर येणे किंवा फिट येणे

- पडणे

संरक्षणासाठी या पद्धती फॉलो करा

रक्तातील साखर कमी झाल्यावर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. रिपोर्ट्स नुसार या लक्षणांवर ताबडतोब उपचार न केल्यास तुम्ही बेशुद्ध होऊ शकता किंवा कोमात जाऊ शकता. रक्तातील साखर खूप कमी होणे ही एक आपत्कालीन स्थिती आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करू शकता.

- दररोज रक्तातील साखर तपासा. ते केव्हा आणि किती वेळा करावे याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला.

- घरातून बाहेर पडण्यापूर्वी नाश्ता जरूर करा. तुमच्या रक्तातील साखर अचानक कमी झाल्यास तुमच्यासोबत कार्बोहायड्रेटयुक्त स्नॅक्स ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner