Diabetes Care: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी व्‍यवस्‍थापनातील या गोष्टी आहेत महत्त्वाच्या!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी व्‍यवस्‍थापनातील या गोष्टी आहेत महत्त्वाच्या!

Diabetes Care: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी व्‍यवस्‍थापनातील या गोष्टी आहेत महत्त्वाच्या!

Published Feb 22, 2024 09:45 PM IST

Health Care: २०१९ ते २०२३ दरम्‍यान मधुमेही व्‍यक्‍तींच्‍या संख्‍येत ४४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

what are the Keys to Managing Diabetes
what are the Keys to Managing Diabetes (freepik)

Keys to Managing Diabetes: आयसीएमआर-आयएनडीआयएबी संशोधनानुसार मधुमेही व्‍यक्‍तींची आकडेवारी २०१९ ते २०२३ दरम्‍यान ४४ टक्‍क्‍यांची वाढ होत १०१ दशलक्षहून अधिकपर्यंत पोहोचली आहे. मधुमेहासारख्‍या क्रोनिक स्थितीचे व्‍यवस्‍थापन करणे आव्हानात्‍मक ठरू शकते. व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या नियंत्रणात ठेवण्‍यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवलंब करू शकतात, जसे त्‍यांच्‍या जीवनशैलीमध्‍ये बदल, नियमितपणे व्‍यायाम, आरोग्‍यदायी आहाराचे सेवन आणि त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवू शकतात.

रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवल्‍याने वैयक्तिक जीवनशैली व केअरबाबत निर्णय घेता येऊ शकते. कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) सारख्‍या प्रगत तंत्रज्ञानासह हे सुलभ करण्‍यात आले आहे. प्रबळ डेटा उपलब्‍ध असल्‍यास व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास आणि इतर आरोग्‍यविषयक आजारांचा धोका कमी करण्‍यास मदत होऊ शकते.

अॅबॉटच्‍या इमर्जिंग एशिया व भारतातील डायबेटिस केअरच्‍या मेडिकल अफेअर्सचे प्रमुख डॉ. प्रशांत सुब्रमण्‍यम म्‍हणाले, ''सीजीएम व्‍यक्‍तींना विनासायास रिअल-टाइममध्‍ये त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यास मदत करते, जे पारंपारिक ब्‍लड ग्‍लुकोज मॉनिटरिंग डिवाईसेसला पूरक आहे, ज्‍यामध्‍ये बोटाला टोचणे आवश्‍यक असते. सीजीएम बहुमूल्‍य, कृतीशील माहिती सांगते आणि डिजिटल इकोसिस्‍टमचे पाठबळ आहे, ज्‍यामुळे डॉक्‍टर्स आणि केअरगिव्‍हर्सशी सहजपणे कनेक्‍ट होते. तसेच हे डिवाईस अद्वितीय मेट्रिक, लक्ष्‍य ग्‍लुकोज रेंजमध्‍ये व्‍यक्‍तींनी व्‍यतित केलेला वेळ याबाबत देखील माहिती देते. हा डेटा माहित असणे जीवनाला कलाटणी देणारा ठरू शकतो आणि व्‍यक्‍तींना आरोग्‍याबाबत स्‍मार्टर निर्णय घेण्‍यास, तसेच रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी सुसज्‍ज असण्‍यास मदत होऊ शकते.''

डिवाईसच्‍या वास्‍तविक विश्‍वातील परिणामांना प्रकाशझोतात आणत निदर्शनास आले आहे की, इन्‍सुलिनवर असलेल्‍या टाइप २ मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींनी सीजीएमचा वापर केल्‍यामुळे अॅक्‍यूट डायबेटिस प्रमाण (५१ टक्‍क्‍यांनी) आणि हॉस्पिटलायझेशन्‍स (२८ टक्‍क्‍यांनी) यामध्‍ये मोठ्या प्रमाणात घट दिसण्‍यात आली. टाइम इन रेंज (टीआयआर) यासारख्‍या मेट्रिक्‍ससह व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या मधुमेहाचे उत्तमप्रकारे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी त्‍यांचा आहार, क्रियाकलाप आणि उपचार समायोजित करू शकतात, ज्‍यामुळे इतर कोमार्बिड स्थिती टाळण्‍यास किंवा व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते. टीआयआरमधील प्रत्‍येक १० टक्‍के घटमुळे डोळे व मूत्रपिंडसंबंधित आजार होण्‍याचा धोका वाढतो, ८० टक्‍क्‍यांहून अधिक टीआयआर असलेले आयसीयूमध्‍ये कमी वेळ व्‍यतित करण्‍याची खात्री मिळते.,

युनिव्‍हर्सिटी ऑफ लीड्स आणि लीड्स टीचिंग हॉस्पिटल्‍स एनएचएस ट्रस्‍टचे मेटाबोलिक मेडिसीनचे प्रोफेसर/ डायबेटिस व एण्‍डोक्रिनोलॉजीमधील कन्‍सलटण्‍ट प्रो. रामझी अज्‍जान म्‍हणाले, ''मधुमेही व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवावी लागते, तसेच हृदयविषयक आजार, लठ्ठपणा व डोळ्यांसंबंधित समस्‍या अशा इतर कोमोर्बिडीटीज विकसित होण्‍याचा धोका असतो. मधुमेह व लठ्ठपणाचा अनेकदा एकमेकांशी संबंध दिसून आला आहे आणि यामुळे हृदयविषयक आजाराचा धोका वाढतो. सीजीएम व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यास आणि असे धोके टाळण्‍यास मदत करू शकते. उदाहरणार्थ, नुकतेच हार्ट अॅटॅक आलेल्‍या आणि सीजीएम डिवाईसचा वापर करत असलेल्‍या टाइप २ मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींमधील हायपोग्‍लासेमिया पातळ्या पारंपारिक सेल्‍फ-मॉनिटरिंग ब्‍लड ग्‍लुकोजचा वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाल्‍याचे निदर्शनास आले. हायपोग्‍लायसेमिया टाळल्‍याने या उच्‍च जोखीम व्‍यक्‍तींना त्‍यांचे दैनंदिन जीवन जगण्‍यास मदत होऊ शकते.''

सीजीएम हृदयविषयक आजारासाठी शस्‍त्रक्रियेची गरज असू शकलेल्‍या व्‍यक्‍तींना मदत करू शकते, जेथे शस्‍त्रक्रियेपूर्वी त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांना ऑप्टिमाइज करू शकते. यामुळे शस्‍त्रक्रियेनंतरच्‍या त्‍यांच्‍या निष्‍पत्तींमध्‍ये सुधारणा होऊ शकते. असे डिवाईसेस व्‍यक्‍तींच्‍या HbA1c पातळ्यांमध्‍ये सुधारणा करतात, ऑप्टिमल ग्‍लुकोज रेंजमध्‍ये व्‍यतित केलेल्‍या वेळेमध्‍ये सुधारणा करतात आणि त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारतात. विशेषत: मधुमेही व्‍यक्‍तींमध्‍ये इतरांच्‍या तुलनेत कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार होण्‍याची शक्‍यता दोन ते चार पटीने अधिक असल्‍यामुळे हे फायदे अत्‍यंत महत्त्वाचे आहेत. तसेच, टाइप २ मधुमेहाने पीडित जवळपास ३० टक्‍के व्‍यक्‍तींमध्‍ये निदानाच्‍या वेळी तीन किंवा अधिक कोमार्बिडिटीज आढळून आले.

प्रो. शशांक आर जोशी (पद्मश्री पुरस्कारप्राप्त), प्रेसिडेंट इंडियन अकॅडमी ऑफ डायबिटीज कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट लीलावती हॉस्पिटल आणि जोशी क्लिनिक म्‍हणाले, ''राज्‍यामध्‍ये जवळपास १०.३% व्‍यक्‍ती मधुमेहाने ग्रस्‍त आहेत. त्‍यांच्‍यासाठी ग्‍लायसेमिक नियंत्रणाचे व्‍यवस्‍थापन करणे महत्त्वाचे आहे, जे सीजीएम सारख्‍या टूल्‍ससह सुलभ करता येऊ शकते. सीजीएम त्‍यांना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची नियमितपणे तपासणी करण्‍यास मदत करते. यामुळे व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेवर परिणाम करणारा आहार व जीवनशैलीबाबत समजण्‍यास मदत होऊ शकते. व्‍यक्‍ती त्‍याअनुषंगाने त्‍यांच्‍या सवयींमध्‍ये, तसेच डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करत उपचारामध्‍ये बदल करू शकतात. परिणामत: त्‍यांची ऑप्टिमल ग्‍लुकोज रेंज दररोज जवळपास १७ तासांपर्यंत राहू शकते. हे कनेक्‍टेड तंत्रज्ञान त्‍यांच्‍या लिंक केलेल्‍या मोबाइल अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून आमच्‍या क्लिनिक्‍सबाहेर देखील व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या घरांपर्यंत आरोग्‍यसेवा पोहोचवू शकतात.''

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍याचा प्रवास आव्‍हानात्‍मक असू शकतो, पण तंत्रज्ञान डायबेटिस केअरसाठी गेम-चेंजर ठरण्‍यास सज्‍ज आहे आणि वैयक्तिकृत हेल्‍थकेअरच्‍या दिशेने वाटचाल सुरू आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही.

Whats_app_banner