Health Care: अनेक भागात प्रचंड गरमी वाढली आहे. अशावेळी आपल्याला शरीराला अनेक गोष्टींची गरज असते. निरोगी जीवनाचा आधार निरोगी खाणे आणि निरोगी लाइफस्टाइल आहे. आपला आहार योग्य असणे फार गरजेचे आहे. यासाठी सर्व भाज्यांसोबत फळे, दूध आणि सुका मेवा संतुलित प्रमाणात घेणे गरजेचे आहे, अशा आहारामुळे शरीराला सर्व प्रकारचे पोषण योग्य प्रमाणात मिळू शकते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी6, फायबर आणि लोह सारखे पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. इम्युनिटी वाढवण्यासोबतच त्वचेला ग्लोही येतो. चला याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात.
> ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन २००९ नुसार, आयबीएस, एंडोमेट्रिओसिस, संधिवात, मधुमेह यांसारखे आजार आता जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या घरात दिसत आहेत. यावर तुम्हाला संत्री फायदेशीर ठरू शकते. संत्र्याचा रस पिल्याने जळजळ होणे कमी होते. प्रथिने आणि फायब्रिनोजेन पातळी योग्य राहते.
> अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन २०१० नुसार, संत्री फायदेच देत नाही तर त्यांचे नुकसान देखील प्रतिबंधित करते.
> संत्र्यामध्ये असलेले नॅरिंगिन आणि निओहेस्पेरिडिन नावाची नैसर्गिक संयुगे रक्तातील साखरेची पातळी अतिशय प्रभावीपणे कमी करतात. त्यामुळे मेटॅबॉलिझम क्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात राहते.
> मेलाटोनिन हा शरीरात आढळणारा एक नैसर्गिक संप्रेरक आहे. हा आपल्या शरीरात दररोज संध्याकाळी तयार होतो. पण स्क्रीन टाइम आणि बदलेल्या लाइफस्टाइलमुळे त्याचे प्रमाण शरीरात कमी होऊ लागते. यामुळे चांगली झोप लागत नाही. जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री १०१३ नुसार, हेच मेलाटोनिन संत्र्यामध्ये देखील आढळते, ज्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील मेलाटोनिनचे प्रमाण ४७% वाढू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)